

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे सुरू असलेल्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत 50 मीटर प्रोन प्रकारात गारगोटीची सानिया सापळे (Saniya Sapale) हिने दोन सुवर्णपदक पटकावले.
तिने 50 मीटर प्रोन जुनियर ओपन स्पर्धेमध्ये कांस्यपदक व ज्युनिअर सिव्हिलियन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. त्याचबरोबर 50 मीटर प्रोन या प्रकारांमध्ये ज्युनियर नॅशनल टीम मध्ये सुवर्णपदक व ज्युनिअर सिव्हिलियन टीममध्ये कांस्यपदक मिळवून महाराष्ट्राचे नाव कोरले आहे. महाराष्ट्र टीमकडून खेळणाऱ्या सानियाने अंतिम सामन्यात 623.1 गुण फरकाने विजेतेपद मिळवून रेकॉर्ड केले आहे.
तसेच याआधी थायलंड येथील शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित बँकॉक आंतरराष्ट्रीय ओपन शूटिंग चॅम्पियन स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. तिला आंतरराष्ट्रीय कोच सद्गुरुदास यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.