

Gangavesh market Car Crash
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील गंगावेश परिसरात आज (दि.१४) दुपारी अपघात घडला. शाहू उद्यानासमोर भर बाजारात अचानक एक चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन घुसले. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी दोघे गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाजारपेठ परिसरात गर्दी असताना अचानक गाडी वेगाने आली आणि नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांवर धडकली. धडकेचा आवाज होताच परिसरात गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस पुढील तपास करत आहेत.