Kolhapur News | शिक्षक पद कपातीवरून लोंघे ग्रामस्थ आक्रमक : परीक्षेच्या पहिल्या दिवशी शाळेला ठोकले कुलूप

लोंघे (ता. गगनबावडा) येथील प्राथमिक शाळेतील अध्यापक पद कमी करण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती आक्रमक
Gaganbawada school protest
लोंघे : येथील प्राथमिक शाळेस शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थाकडून वर्गखोल्या व कार्यालयाला कुलूप लावण्यात आले Pudhari
Published on
Updated on

Gaganbawada school protest

साळवण : लोंघे (ता. गगनबावडा) येथील प्राथमिक शाळेतील अध्यापक पद कमी करण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती आक्रमक झाली होती. प्रशासनाकडून तातडीने निर्णय न घेतल्याचे निषेधार्थ विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी शाळेच्या वर्गखोल्या व कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले. मात्र, नंतर प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

सन २०२३/२४ च्या संचमान्यते दरम्यान इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नोंद ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक कारणांमुळे न झाल्याने शाळेचा एकूण विद्यार्थी पट प्रत्यक्षापेक्षा कमी दाखविण्यात आला. या चुकीच्या आकडेवारीच्या आधारे शाळेतील एक अध्यापक पद अतिरिक्त घोषित करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीत त्या वर्षी शाळेचा विद्यार्थी पट ६९ होता.

Gaganbawada school protest
Kolhapur news | स्कॉफ आराखडा भरण्यास मुदतवाढ मिळावी

त्यानंतरच्या २०२४/२५ तसेच चालू २०२५/२६ या शैक्षणिक वर्षातही विद्यार्थी संख्या सातत्याने ६० पेक्षा अधिक आहे. असे असतानाही केवळ तांत्रिक त्रुटीच्या आधारे शिक्षक पद कमी करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या संदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वी आयुक्त कार्यालय, पुणे तसेच शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. मात्र, ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत शाळेला कुलूप ठोकले.

दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून कायमस्वरूपी शिक्षक देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले. शिक्षक पद कमी झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, ग्रामीण भागातील शाळेचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ऑनलाईन प्रणालीमध्ये झालेली तांत्रिक चुकीची दुरुस्ती करून पट संख्येनुसार कायमस्वरूपी शिक्षक देण्यात येईल.

- वसुंधरा कदम, गटशिक्षणाधिकारी, गगनबावडा

आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थी पट संख्येनुसार शाळेस कायमस्वरूपी शिक्षक मिळावा.

- सतीश पाटील, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, लोंघे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news