Kolhapur Flood : अकिवाट महापुरात वाहून गेलेल्‍या दोघांपैकी माजी सरपंच हसुरेंचा मृतदेह सापडला

अकिवाट राजापूर पुला दरम्‍यान माजी सरपंच हसुरे यांचा मृतदेह रेस्‍क्यू फोर्सच्या जवानांनी शोधून काढला
Kolhapur Flood: The body of one of the two people who were swept away in the Akiwat flood was found
Kolhapur Flood : अकिवाट महापुरात वाहून गेलेल्‍या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडलाPudhari Photo
Published on
Updated on

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा

अकिवाट ता. शिरोळ येथे काल (शुक्रवार) सकाळी दत्‍तवाड हद्दीत असलेल्या ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी जात असलेला ट्रॅक्टर महापुराच्या पाण्यातच उलटला होता. यामध्ये आठजण पाण्यात वाहून जात होते. त्‍यापैकी सहाजण सुखरूप बाहेर आले होते, तर माजी जि. प सदस्य इकबाल बैरगदार, आण्णासाहेब हसुरे दोघे पाण्यात वाहून गेले होते.

Kolhapur Flood: The body of one of the two people who were swept away in the Akiwat flood was found
Kolhapur Flood : अकिवाट गावाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट

या दोघांचाही शोध सुरू होता. त्यापैकी आज (शनिवार) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांना शोध मोहिमेत माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह सापडला. दरम्यान हा मृतदेह अकिवाट, राजापूर दरम्यान मिळून आला. माझी जिल्हा परिषद सदस्य इकबाल वैरागदार यांचा अद्यापही शोध लागलेला नाही, त्यांची शोध मोहीम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news