कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत चार योजनांतील पात्र निराधारांना दरमहा 1 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. जिल्ह्यात डिसेंबर 2022 अखेर अनुदानप्राप्त 1 लाख 38 हजार 928 लाभार्थी आहेत. त्यांना राज्य व केंद्र शासनाकडून वर्षभरात सुमारे 166 कोटी 71 लाख 36 हजार रुपयांचे अर्थसहाय्यकेले जाते.
…या आहेत योजना
संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण)- दरमहा 1000
संजय गांधी निराधार योजना(अनुसूचित जाती)- दरमहा 1000 (700 रुपये राज्य शासन व 300 रुपये केंद्र शासन)
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन (सर्वसाधारण) – दरमहा 1000
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन (अनुसूचित जाती)- दरमहा 1000 (800 रुपये राज्य शासन व 200 रुपये केंद्र शासन)
आवश्यक कागदपत्रे
लाभार्थ्याचे नाव असलेले रेशन कार्ड, आधार कार्ड,उत्पन्नाचा दाखला, जन्मदाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला अथवा जिल्हा शल्यचिकित्सकांचा वयाचा दाखला, मुले असतील तर त्यांचा जन्मदाखला,हमीपत्र.
…येथे करावा अर्ज
आधारकार्ड, रेशनकार्डवर पत्ता असलेल्या तहसील कार्यालयात. अर्ज सादर केल्यानंतर समितीपुढे होते छाननी. समितीकडे पात्र, अपात्रतेचे असतात अधिकार.
योजनेसाठीचे असे आहेत निकष
संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण): विधवा, दिव्यांग, घटस्फोटित, परित्यक्ता महिला. वार्षिक उत्पन्न 21 हजारांपेक्षा कमी. मुले असतील तर 25 वर्षांखालील.
संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जाती) : दिव्यांग,घटस्फोटित, परित्यक्ता महिला. वार्षिक उत्पन्न 21 हजारांपेक्षा कमी. मुले असतील तर 25 वर्षांखालील. जातीचा दाखला
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन (सर्वसाधारण) :
65 वर्षांवरील महिला-पुरुष. वार्षिक उत्पन्न 21 हजारांखाली.
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन (अनुसूचित जाती) :
65 वर्षांवरील महिला-पुरुष. वार्षिक उत्पन्न 21 हजारांखाली.