

प्रयाग चिखली : घराजवळील तळ्यात हात-पाय धुण्यासाठी गेलेल्या वरणगे येथील शेतकऱ्याचा तळ्यात तोल जाऊन पडल्याने बुडून मृत्यू झाला. कृष्णात पांडुरंग पाटील (वय ४९) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कृष्णात पाटील हे बुधवारी (दि.६) रात्री दहाच्या सुमारास जनावरांना चारा घालून त्यांच्या घराजवळ असलेल्या तळ्यात हातपाय धुण्यासाठी गेला तोल जाऊन ते पाण्यात पडले. ते घरी लवकर न आल्याने त्यांचा नातेवाईकांनी ताळ्यातील पाण्यात जाऊन शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.