

गेवराई : गेवराई तालुक्यातील आहेर वाहेगाव येथे गुरुवारी सकाळी रस्ता ओलांडत असताना समोरुन येत असलेल्या टाटा सुमो ची जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात सात वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. ७ रोजी सकाळी घडली.
गेवराई स्टेडियम जवळ राहत असलेला श्रेयस शहादेव काळे हा दुसरी वर्गात शिकत असलेला विद्यार्थी दिवाळी सुट्टी निमित्त आजोळी आहेर वाहेगाव येथे गेला होता. गुरुवारी सकाळी तो रस्ता ओलांडत असताना पाचेगाव कडून येणाऱ्या टाटा सुमो ने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र तत्पूर्वी त्याचे निधन झाले. त्याच्यावर पाडळशिंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.