

शिरोली एमआयडीसी : लग्नाचे खोटे आमिष दाखवून जबरस्तीने शारीरीक संबंध ठेवत पिडीत महिलेवर जादूटोणा करून भिती दाखवून ठार मारण्याची धमकी देत असल्याने पिडीत महिलेने तिघांविरोधात शिरोली एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
शिरोली पोलिसातून मिळालेली माहिती अशी की पिडीत महिला सावंतवाडी येथील मुळची रहीवाशी असुन ती २०१९ मध्ये शिये ता. करवीर येथील बेबीजान दस्तगीर लेंगरे यांच्या घरी भाड्याने राहणेस आली होती त्यावेळी आरोपी गैबीसाब दस्तगीर लेंगरे ( रा. रामनगर, शिये ता. करवीर ) यांच्याशी बेबीजान हीने दोघांच्यात ओळख करून त्यांची मैत्री करण्यास भाग पाडले. गैबीसाब हा विवाहित असल्याची माहीती पिडीत महिलेपासून लपवून दोघांनी संगणमताने पिडीतेस अंधारात ठेवले.
गैबीसाबने “मी तुझ्याशी लग्न करणार आहे, तू मला खूप आवडतेस” असे सांगत लग्नाचे खोटे आमिष दाखवून पीडितेशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नव्हे तर पीडितेला धाक दाखवण्यासाठी जादूटोण्याचा वापर करण्यात आला. आरोपीने एका पेटीत आपला फोटो, लिंबू, खिळा व ताईत ठेवून पीडितेला दाखवले. “ही पेटी जर कुणाला दाखवलीस तर तुला ठार मारीन, तोंड दाखवायला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकीही आरोपीने दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
लग्नाचे खोटे आमिष दाखवून जबरस्तीने शारीरीक संबंध ठेवत पिडीत महिलेवर जादूटोणा करून भिती दाखवून ठार मारण्याची धमकी देत असल्याने पिडीत महिलेने तिघांविरोधात शिरोली एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.