kolhapur | कोल्हापुरात ‘पाणीबाणी’; सी, डी वॉर्ड वगळता दिवसाआड पाणी; टँकरला पोलिस बंदोबस्त

Kolhapur water scarcity
kolhapur | कोल्हापुरात ‘पाणीबाणी’; सी, डी वॉर्ड वगळता दिवसाआड पाणी; टँकरला पोलिस बंदोबस्तPudhari Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील तीनपैकी एक पंप नादुरुस्त झाल्याने शहरात ऐन पावसाळा आणि सणासुदीत ‘पाणीबाणी’ निर्माण झाली आहे. गुरुवारी 98 ठिकाणी महापालिका आणि खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. शुक्रवारपासून सी व डी वॉर्ड वगळता उर्वरित वॉर्ड आणि परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान, टँकरसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

पंप कार्यान्वित होईपर्यंत पुईखडी जल शुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असणार्‍या शहरातील ए, बी व ई वॉर्ड तसेच संलग्न उपनगर, ग्रामीण भागात दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. ए व बी वॉर्ड तसेच संलग्न उपनगर आणि ग्रामीण भागातील परिसरात ए व बी वॉर्डमध्ये गुरुवारपासून दिवसआड पाणीपुरवठा सुरू झाला. पुईखडी परिसर, साने गुरुजी, आपटेनगर, जरगनगर, साळोखे नगर, राजोपाध्ये नगर, कणेरकरनगर, नाना पाटील नगर, देवकर पाणंद, सुर्वेनगर, आयटीआय परिसर, रायगड कॉलनी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, संभाजीनगर, शेंडापार्क यांचा समावेश आहे.

ई वॉर्डमध्ये शुक्रवारपासून ई वॉर्डात एक दिवस आड पाणीपुरवठा होईल. यात राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, पांजरपोळ, सम—ाटनगर, दौलतनगर, शाहूपुरी, राजेंद्रनगर, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, लोणार वसाहत, लिशा हॉटेल परिसर, महाडिक वसाहत आदी परिसराचा समावेश आहे.

98 ठिकाणी टँकरने पुरवठा

महापालिकेकडून युद्धपातळीवर टँकरद्वारे शहरात पाणीपुरवठा सुरू केला आहे. गुरुवारी दिवसभरात महापालिका आणि खासगी अशा 31 टँकरद्वारे सायंकाळी 7 पर्यंत 98 ठिकाणी पाणीपुरवठा केला. कळंबा फिल्टर हाऊस येथून खासगी 16 व महापालिकेचे 2 असे 18 टँकर सोडण्यात आले. सायंकाळपर्यंत 56 फेर्‍या झाल्या. बावडा फिल्टर हाऊस येथून खासगी 11 व महापालिकेचे 2 असे 13 टँकर कार्यरत असून एकूण 42 फेर्‍यांद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केल्याची माहिती महापालिकेने पत्रकाद्वारे दिली आहे.

महापालिकेमार्फत टँकर व्यवस्था

महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली आहे. टँकरकरिता कळंबा फिल्टर हाऊस संपर्क : गणेश लोखंडे (मो. 9766360506) , बावडा फिल्टर हाऊस संपर्क : संभाजी पाटील (मो. 9860448844) या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news