Kolhapur | देवस्थान, संस्थान जमिनीच्या शेतकऱ्यांसमोर खत खरेदीचा पेच! ऑनलाईन लिंकिंगमध्ये आधार क्रमांकाचा अडथळा

Aadhaar linking hurdle for fertilizer purchase- देवस्थान, संस्थान जमिनीच्या शेतकऱ्यांसमोर खत खरेदीचा पेच! ऑनलाईन लिंकिंगमध्ये आधार क्रमांकाचा अडथळा, वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी
Documents
DocumentsPudhari
Published on
Updated on

शिरढोण /बिरू व्हसपटे:

खत खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर लिंकिंग प्रक्रिया अनिवार्य करण्यात आल्याने देवस्थान तसेच संस्थानिक इनामी जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर प्रत्यक्ष कसणाऱ्या शेतकऱ्याचे नाव नसून मालकी सदरी देवस्थान अथवा संस्थेचे नाव असल्याने ऑनलाईन प्रक्रिया पुढे सरकत नसल्याची अडचण निर्माण होत आहे.

सॉफ्टवेअरमध्ये प्रथम भोगवटाधारक अथवा मालकाचे नाव टाकल्यानंतर त्याचा आधार क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे. मात्र, देवस्थान जमिनीच्या बाबतीत मालकी सदरी देवस्थानचे नाव असल्याने आधार क्रमांक कोणाचा नोंदवायचा, असा प्रश्न निर्माण होतो. परिणामी, लिंकिंगची पुढील प्रक्रिया खुली होत नसल्याने खत खरेदी करता येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Documents
Kolhapur News : किट्टवडे धनगरवाड्यात भरदिवसा टस्कर

शिरढोण–टाकवडे परिसरासह अशा जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. जिल्हा परिषद सदस्या अर्चना अमोल चौगुले यांनी शिरोळ तालुका कृषी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून या तांत्रिक अडचणीवर तातडीने तोडगा काढावा आणि खत खरेदीपासून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. प्रशासन याबाबत कोणती कार्यवाही करते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

खत मिळणार की ऑनलाईन प्रक्रियेतच अडकणार?

देवस्थान व संस्थानिक इनामी जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर त्यांचे नाव नसल्याने खत लिंकिंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. मालकी सदरी देवस्थानचे नाव आणि पुढे आधार क्रमांकाची सक्ती असल्याने प्रक्रिया ठप्प होत आहे. प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना खतापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असून प्रशासनाने तातडीने स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

Documents
Kolhapur News : पाटगावचा मौनीसागर जलाशय १०० टक्के भरला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news