Kolhapur : शिवसेनेची दहीहंडी ‘गोडीविहीर’ने फोडली

Kolhapur : शिवसेनेची दहीहंडी ‘गोडीविहीर’ने फोडली

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लेझर लाईटचा झगमगटात आणि साऊंड सिस्टीमचा दणदणाट अशा उत्साही वातावरणात तब्बल पाच तासाहून अधिक वेळ छत्रपती शिवाजी महाराज संयुक्त मित्र मंडळाच्या दहीहंडीचा सोहळा रंगला. गुरुवारी रात्री दहा वाजता प्रत्यक्ष दहीहंडीच्या थरारास सुरुवात झाली. दोन-तीन गोविंदा पथकांच्या अयशस्वी प्रयत्नानंतर शिरोळच्या गोडीविहीर तालीम मंडळाच्या संजय गोंदडे या गोविंदा पथकाने सहाव्या थरावर सुमारे 25 फूट उंचीवरील दहीहंडी फोडली.

गोविंदा पथकाला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. गोविंदा पथकाने दहीहंडी फोडताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. टाळ्या-शिट्ट्या वाजवत सर्वांचे अभिनंदन केले. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय…' यासह विविध जयघोष करण्यात आला.

दरम्यान, मंडळाचे अवधूत अपराध व कपील केसरकर आणि पदाधिकार्‍यांच्या हस्ते श्रीकृष्णाची मूर्ती, दहीहंडीचे पूजन करण्यात आले. शाहू गर्जना ढोल-ताशा पथकासह संदिप मछले ग्रुपच्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाची रंगत वाढविली. सप्तरंगी पेपर ब्लास्टिंगने वातावरण निर्मीती केली. यशस्वी सलामी देणार्‍या मंडळांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी कृष्णराज महाडिक, ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, अजय इंगवले, जितू सलगर, किशोर घाटगे, सुनिल जाधव, उदय भोसले, शिवाजीराव जाधव, रणजीत जाधव, जयाजी घोरपडे, प्रभाकर गायकवाड, उद्योजक नितीन ओसवाल, अंकुश निपाणीकर, प्रसाद ओतारी, कमलाकर किलकिले यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news