Kolhapur Crime : कॅन्सरवरील औषधाच्या बहाण्याने बलात्कार करणाऱ्या भोंदूला बेड्या

पन्हाळा - बोरपाडळी रोडवरून नराधमाला घेतले ताब्यात
Kolhapur Crime News
कॅन्सरवरील औषधाच्या बहाण्याने भोंदूचा विवाहितेवर बलात्कार
Published on
Updated on

कोल्हापूर : कॅन्सरवरील औषधाच्या बहाण्याने महिलेला कळंबा येथील लॉजवर नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या भोंदूला स्थानिक गुन्हे अन्वेषणने शनिवारी सायंकाळी पन्हाळा - बोरपाडळी रोडवर बेड्या ठोकल्या. प्रतीक चंद्रकांत मुळे (38, रा. लुगडी ओळ, लक्ष्मीपुरी) असे त्याचे नाव आहे. रविवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पीडित महिलेने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी संशयित पसार झाला होता. राजवाडा पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकांनी संशयिताच्या अटकेसाठी मलकापूर, कराडसह कर्नाटकातील अंकली (ता. चिक्कोडी) येथे शोधमोहीम राबविली. पन्हाळा- बोरपाडळे रस्त्यावर तो वावरत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरेसह पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.

संशयिताकडून गुन्ह्याची कबुली

प्राथमिक चौकशीत संशयिताने गुन्ह्याची कबुली दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले. गुन्ह्यात वापरलेल्या मोटारीचा शोध घेण्यात येत आहे. फरारी काळात संशयिताचे पन्हाळा परिसरात काही लॉजवर वास्तव्य होते. असेही सांगण्यात आले. संशयिताच्या संपर्कात असणाऱ्या शहरातील सहा- सात तरुणांकडे पोलिसांनी चौकशी केली. काही नातेवाईकांकडेही चौकशी झाली. मात्र त्याच्याशी काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लॉजमधील खोलीचा पंचनामा

संशयिताने पीडितेला कॅन्सरवरील औषध देण्याच्या बहाण्याने कळंबा येथील लॉजवर नेऊन बलात्कार केला होता. राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी लॉजची झडती घेतली. खोलीचा पंचनामा केला. लॉजवरील रजिस्टर ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news