Abdul Lat Gram Panchayat : अब्दुल लाट ग्रामपंचायतीच्या कारभार व नोकर भरतीच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेकडून चौकशी समिती स्थापन

जिल्हा परिषद प्रशासनाची दखल ; गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी होऊन शिस्तभंग कारवाई होण्याची शक्यता
Abdul Lat Gram Panchayat : अब्दुल लाट ग्रामपंचायतीच्या कारभार व नोकर भरतीच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेकडून चौकशी समिती स्थापन
Published on
Updated on

अब्दुल लाट : ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारी अनिल भारमल यांच्या काळातील कथित बेकायदेशीर, बोगस व लाखों रुपयांचा भ्रष्ट कारभारासह बेकायदेशीर कायमस्वरूपी नोकर भरतीच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जास्मिन यांनी चौकशी समिती स्थापन केले आहे.

Abdul Lat Gram Panchayat : अब्दुल लाट ग्रामपंचायतीच्या कारभार व नोकर भरतीच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेकडून चौकशी समिती स्थापन
Kolhapur crime: जि. प. सीईओंसह आमदारांच्या शासकीय सुरक्षा कर्मचाऱ्यांचे वाहन रोखले; चौघांवर गुन्हा दाखल

विशेष म्हणजे, चौकशीमध्ये स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांऐवजी इतर तालुक्यांतील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे चौकशी अधिक निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. अब्दुल लाट ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत तसेच कायमस्वरूपी नोकर भरतीच्या प्रक्रियेबाबत ग्रामस्थांकडून यापूर्वीच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार व चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र, या तक्रारीनंतर वेळेत कोणतेही चौकशी अथवा ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे कारवाईत कसूर केल्याचे आरोप करत थेट शिरोळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंग कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Abdul Lat Gram Panchayat : अब्दुल लाट ग्रामपंचायतीच्या कारभार व नोकर भरतीच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेकडून चौकशी समिती स्थापन
Kolhapur Crime : धाप लागून प्रकृती अत्यवस्थ; वाहकाचा उपचारादरम्यान मृत्यू

याच पार्श्वभूमीवर आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कारभारासोबतच संबंधित प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी केली होती. कर्तव्यात कसूर झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. आता ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन झाल्याने या समितीच्या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीतील आर्थिक व्यवहार, कागदोपत्री नोंदी, विविध कामांची अंमलबजावणी, नोकर भरतीची प्रक्रिया, पात्रता, नियुक्तीची पद्धत तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका या सर्व बाबींची चौकशी होणे अपेक्षित आहे.

Abdul Lat Gram Panchayat : अब्दुल लाट ग्रामपंचायतीच्या कारभार व नोकर भरतीच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेकडून चौकशी समिती स्थापन
Kolhapur Crime : भागीदारीतील व्यवहारावरून पिता, पुत्राचे अपहरण करून मारहाण

‘दोषी कोणताही असो, कारवाई झालीच पाहिजे’ अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून चौकशी निष्पक्षपणे करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या चौकशीसोबतच गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत असल्याने या प्रकरणात पुढे कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे अब्दुल लाटसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news