

Bombay Highcourt Kolhapur Circuit Bench Opening Video
कोल्हापूर : कोल्हापूर येथे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांनी उराशी जपलेले मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंचचे स्वप्न आज शाही सोहळ्याने साकार झाले. या ऐतिहासिक सुवर्णदिनी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ना. भूषण गवई यांच्या शुभहस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन झाले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ना. मकरंद कर्णिक यांनी अध्यक्षस्थान भूषविले. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक अराधे तसेच उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर हेही यावेळी उपस्थित होते. भाऊसिंगजी रोडवरील न्यायालय इमारतीतील उद्घाटन सोहळा आणि त्यानंतर मेरी वेदर ग्राऊंड येथे उद्घाटनाचा सोहळ्याचा व्हिडिओ पहा.