Kolhapur Elderly Man Body | सत्तेवाडी येथील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह ताम्रपर्णी नदीत सापडला

२ जूनपासून घरातून बेपत्ता, चंदगड पोलिसांत तक्रार
Sattewadi Tamraparni River Body Found
सिताराम विठोबा साबळेPudhari
Published on
Updated on

Sattewadi Tamraparni River Body Found

चंदगड : सत्तेवाडी (ता. चंदगड) येथील सिताराम विठोबा साबळे (वय 75, रा. सत्तेवाडी, ता चंदगड) हे राहत्या घरातून दि. 2 जून पासून बेपत्ता झाल्याची वर्दी त्यांचे चिरंजीव नामदेव साबळे यांनी चंदगड पोलिसांत दिली होती.

दरम्यान, त्यांचा मृतदेह ताम्रपर्णी नदीत पोवाचीवाडी या गावच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बाहेर फिरायला जाऊन येतो म्हणून बाहेर पडले ते घरी परतले नव्हते. मागील काही दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती योग्य नव्हती.

Sattewadi Tamraparni River Body Found
Kolhapur Water Crisis | कोल्हापूर शहरात पाणीटंचाईचे सावट; शनिवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा

२ जूनरोजी सायंकाळी चार वाजता ते घरातून बाहेर पडले होते. दरम्यान पोवाचीवाडी येथील अनिल पांडुरंग पाटील या शेतकऱ्याच्या शेताजवळील ताम्रपर्णी नदीमध्ये गुरुवारी सकाळी दहा वाजता त्यांचा मृतदेह आढळला.अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित कांबळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news