Kolhapur Water Crisis | कोल्हापूर शहरात पाणीटंचाईचे सावट; शनिवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा

काळम्मावाडी धरणातील पाणीसाठ्यात घट, थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणारा पाणी उपसा बंद
Water Scarcity
Water ScarcityAI Photo
Published on
Updated on

Kalamwadi Dam Water Level

कसबा बावडा : अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा लक्षणीयरीत्या घटला आहे. यामुळे काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणारा पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. परिणामी शहराला या योजनेतून पाणीपुरवठा करणे शक्य नाही, असे कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. मात्र उपलब्ध जलस्रोतांची मर्यादित क्षमता आणि नदीतील पाणीपातळी लक्षात घेता शहर व उपनगरांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Water Scarcity
kolhapur | रस्त्यांसाठीच्या वृक्षतोडीचा १० वर्षांचा आराखडा जाहीर करावा; पर्यावरणप्रेमींची मागणी

शनिवारी (दि. १३) पासून लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, रविवार पेठ, भवानी मंडप परिसर, फुलेवाडी रिंगरोड, नृसिंह कॉलनी तसेच संबंधित ग्रामीण भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

रविवार (दि. १४) पासून महाद्वार रोड परिसर, रंकाळा, ब्रह्मपुरी, दुधाळी, पंचगंगा रोड, सिद्धार्थनगर, राजेसंभाजी नगर, कणेरकरनगर आणि तुळजाभवानी परिसरात ही अंमलबजावणी सुरू होईल.

Water Scarcity
kolhapur | कोल्हापूर जिल्ह्यातील ५३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

पुईखडी व कसबा बावडा फिल्टर हाऊसअंतर्गत येणाऱ्या राजारामपुरी, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, कावळा नाका, बावडा, कदमवाडी, लाईनबाजार, सदर बाजार आदी भागांनाही या नियोजनाचा फटका बसणार आहे.

महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news