Kolhapur Bike Theft | माणगाव येथे दुचाकी चोरणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची टोळी जेरबंद

Chandgad Police Action | टोळीकडून 21 हजार रुपये रोख, तीन लाखांच्या आठ दुचाकी जप्त
Chandgad Mangaon Bike Theft Gang
चंदगड : जप्त केलेल्या दुचाकीसह पोलीस अधिकारी व तपास पथकातील पोलीसPudhari
Published on
Updated on

Chandgad Mangaon Bike Theft Gang

चंदगड : चंदगड तालुक्यातील विविध गावातून दुचाकी चोरी करून अन्य ग्राहकांना कमी किंमतीत विकणारी माणगाव (ता. चंदगड) येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची टोळी चंदगड पोलिसांनी जेरबंद केली. याप्रकरणी साईनाथ दयानंद सावंत ( रा. माणगाव, ता. चंदगड) या मुख्य संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्य दोघे अल्पवयीन असल्याने त्यांना सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे. या टोळीकडून 21 हजार रुपये रोख रक्कम व तीन लाख रुपयांच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आणखी काहीही तरुण असण्याची शक्यता असून तपास सुरू आहे.

Chandgad Mangaon Bike Theft Gang
Kolhapur News : अडकूरमध्ये 'भक्ती' अन् 'शक्ती'चा संगम; ज्ञानेश्वरी पारायणात रंगले स्मार्ट मीटरचे प्रवचन

याबाबत अधिक माहिती अशी की, साईनाथ व दोन साथीदारांनी मागील काही महिन्यामध्ये ढोलगरवाडी, मुगळी, जक्कनहट्टी, कोवाड, चंदगड या ठिकाणाहून दुचाकी चोरून नेल्या होत्या. यामध्ये आणखी काही तरुणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. यापैकी काही दुचाकी शिवणगे व माणगाव या गावातील ग्राहकाना विकल्या.

अल्पवयीन दोन तरुणांनी स्वतः साईनाथ याच्याकडून कमी किंमतीमध्ये दुचाकी आपणही खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यांच्याकडून आणखी कोणत्या गावातून गाड्या चोरी झाल्या आहेत?, याबाबत तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांनी सांगितले.

Chandgad Mangaon Bike Theft Gang
Kolhapur boundary expansion | कोल्हापूरची हद्दवाढ लटकली, राजकारणातच पुन्हा अडकली!

चोरांच्या टोळीकडून कडून १५ हजार रुपये, ३० हजार रुपये, २० हजार रुपये, ४० हजार रुपये, तसेच ३५ हजार रुपये किमतीच्या ४ दुचाकी जप्त केल्या. याशिवाय दुचाकी विक्री करून मिळवलेले २० हजार रुपये रोख रक्कम, असा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. बी. गेंगजे, वसीम देसाई, आनंदा नाईक, राजेश अंबुलकर, सुनील माळी, अजय वाडेकर, ईश्वर नावलगी, दिगंबर गायकवाड, नितीन पाटील, ऋषीराज कोरवी, गोविंद जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news