Kolhapur Accident | अनियंत्रित कारचा बॅरिकेटला धडकून चक्काचूर : हेरवाडजवळ भीषण अपघात; चौघे जखमी

ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले;
Kolhapur Accident | अनियंत्रित कारचा बॅरिकेटला धडकून चक्काचूर :  हेरवाडजवळ भीषण अपघात; चौघे जखमी
Kolhapur Accident | अनियंत्रित कारचा बॅरिकेटला धडकून चक्काचूर : हेरवाडजवळ भीषण अपघात; चौघे जखमी
Published on: 
Updated on: 

कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील आरबी पेट्रोलियम पेट्रोल पंपाजवळ रविवारी चारचाकीचा भीषण अपघात झाला. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी बॅरिकेटला जोरात धडकली. या अपघातात चालकासह चौघे जखमी झाले असून, त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

इचलकरंजी येथील एक कुटुंब कारमधून हेरवाडहून कुरुंदवाडच्या दिशेने जात होते. आरबी पेट्रोलियम पंपाजवळ समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे भरधाव कार थेट लोखंडी बॅरिकेटला धडकली. धडकेची तीव्रता इतकी होती की, बॅरिकेटचा काही भाग कारच्या काचेतून आत घुसला. कारचे छत, मागील भाग आणि दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. गाडीचे तुकडे रस्त्यावर विखुरले होते.

अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींची प्रकृती आणि अपघाताचे नेमके कारण याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.