कोल्हापूर : औरवाडमध्ये ग्रा.पं. निवडणुकीनंतरही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

कोल्हापूर : औरवाडमध्ये ग्रा.पं. निवडणुकीनंतरही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
Published on
Updated on

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा नुकताच बसलेला आहे. परंतु,औरवाड (ता. शिरोळ) मध्ये फ्लेक्सवरून राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. तर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. सरपंचपदाचे पराभूत उमेदवार आय. आय. पटेल यांनी मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी उभारलेला फलकातून सत्ताधाऱ्यांकडून कामांची अपेक्षा केली. तर या फलकला अज्ञाताने फलकाद्वारेच उत्तर दिले आहे, याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.

औरवाड ग्रामपंचायत निवडणुकीत आय.आय. पटेल विरुद्ध शफी पटेल, शहानवाज पटेल अशी अटीतटीची लक्षवेधी लढत झाली. यामध्ये 200 मतांची आघाडी घेत शफी पटेल यांनी बाजी मारली. पराभाव झाला असला तरी आय.आय पटेल यांनी डिजिटल फलकाद्वारे मतदारांचे आभार मानले. मात्र, फलक उभारताना त्यांनी शफी पटेल यांनी दिलेले आश्वासन पाळावेत आणि ५ वर्ष घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी, असे आवाहन दिले.

तर याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी अज्ञातांनी फलक उभा करून आय.आय. पटेल यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाविकास परिवर्तन आघाडी औरवाडचे सरपंचपदाचे उमेदवार आय. आय. पटेल यांना दुसऱ्या क्रमांकाची मते दिल्याबद्दल तमाम ग्रामस्थांचे हार्दिक हार्दिक आभार. औरवाड ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्था सर्व खातेदार यांची सर्व प्रकारची कर्जे व व्याज माफ करीत आहे. याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी व खिद्रापूर गावामध्ये एलान फाउंडेशनतर्फे बांधण्यात आलेल्या घरांमध्ये जी बेकायदेशीर वसुली केली आहे. ती परत करेन आणि राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करून देईन, अशा मजकुराचा फलक लावत प्रतिउत्तर दिले आहे.

या दोन डिजिटल वॉरमुळे औरवडचे राजकीय वातावरण तापले आहे. आरोप प्रत्यारोप होत असून या दोन डिजिटल फलकांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

लोकशाहीमध्ये निवडून येणाऱ्या उमेदवारांकडून अपेक्षा करणे गैर नाही. आमच्या फलकामधून कामांची मागणी केली आहे. कोणतीही कुरघोडी केलेली नाही. आमच्या संस्थेबद्दल आणि कामकाजाबद्दल फलक लावणाऱ्याचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी कुरुंदवाड पोलिसांत तक्रार दिली आहे.

– आय.आय. पटेल

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news