Ajara Taluka Politics | आजरा पं. स. च्या सभापती जयश्री गाडे यांचा जातीचा दाखला अवैध; तालुक्याच्या राजकारणात खळबळ

आजरा पंचायत समितीच्या सभापती जयश्री गाडे यांचा कुणबी जात वैधता दावा फेटाळला
 Jayashree Gade Caste Certificate Invalid
Jayashree Gade Pudhari
Published on
Updated on

Ajara Jayashree Gade Caste Certificate Invalid

आजरा : आजरा पंचायत समितीच्या सभापती जयश्री गाडे यांचा कुणबी जातीचा दावा जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे त्यांच्या सभापतीपदासह सदस्यत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने गाडे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर जयश्री गाडे यांनी भादवण गणातून विजय मिळवत पंचायत समितीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची सभापतीपदी निवड झाली. विशेष म्हणजे, भादवण गावातून यापूर्वी कधीही पंचायत समिती सदस्य निवडून आला नव्हता. त्यामुळे गाडे यांच्या निवडीमुळे गावाला प्रथमच पंचायत समितीच्या सर्वोच्च पदावर प्रतिनिधित्व मिळाले होते.

 Jayashree Gade Caste Certificate Invalid
Kolhapur Crime : चंदगडमध्‍ये रुग्‍ण तरुणीचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला अटक

नव्या गणरचनेनंतर आजरा तालुक्यातील पाच गणांच्या जागी चार गण अस्तित्वात आले असून त्यामध्ये भादवण, उत्तूर, पेरणोली आणि वाटंगी या गणांचा समावेश आहे. या निवडणुकीत वाटंगी वगळता अन्य तीन गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती.

भादवण गण हे इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी आरक्षित होते. त्यामुळे या जागेसाठी भारती डेळेकर, साधना केसरकर आणि जयश्री गाडे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. या चुरशीच्या निवडणुकीत गाडे यांनी विजय मिळवला. त्यानंतर आघाडीतही त्यांना कोणताही प्रतिस्पर्धी नसल्याने त्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली होती.

 Jayashree Gade Caste Certificate Invalid
Kolhapur News : शाहूवाडीच्या जवानासह दोघे एलओसीवर शहीद

दरम्यान, जात पडताळणी समितीच्या निर्णयानंतर आता पुढील कायदेशीर घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गाडे या उच्च न्यायालयात आव्हान देणार का, तसेच या निर्णयाचा पंचायत समितीच्या सत्तासमीकरणांवर काय परिणाम होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यातील राजकीय घडामोडींना या प्रकरणामुळे वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news