

शिरोली एमआयडीसी : पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथे ट्रकचा हब तुटल्याने ट्रक सेवा रस्त्यावर पलटी झाला. सेवा रस्त्यावर रहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातामुळे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज गुरूवारी सकाळी आठ वाजता पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईहून बेंगळुरूकडे कलरच्या बादल्या घेवून जात होता. ट्रक क्रमांक( के ए १८ बी ७८०३ ) हा नागाव फाटा येथील कोल्हापूर स्टील कंपनीसमोर आला असताना ट्रकचा हब तुटला. त्यामुळे चालकाचा ट्रक वरील ताबा सुटून ट्रक सेवा रस्त्यावर पलटी झाला.त्यावेळी पावसाची रिपरिप सुरू होती या रस्त्यावर नेहमीच जास्त रहदारी असते.
पण घटनेच्या वेळी रस्त्यावर रहदारी कमी होती त्यामुळे कोणत्याही प्रकारची सुदैवाने जिवीत झाली नाही . या ठिकाणी ट्रक पलटी होण्याची तिसरी घटना असून हा अपघात फक्त रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे झाला आहे. याठिकाणी रस्त्याचे काम सुरू असूनही सुचनाफलक लावण्यात आलेले नाहीत, तर सुरू असलेल्या कामात फारचं दिरंगाई झाली आहे. यापुढे तर रस्ते विकास महामंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा निष्पाप लोकांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.