कोल्हापूर : भीषण अपघातात नवविवाहितेचा मृत्यू; आई, भाऊ गंभीर जखमी

कोल्हापूर : भीषण अपघातात नवविवाहितेचा मृत्यू; आई, भाऊ गंभीर जखमी
Published on
Updated on

निगवे खालसा; पुढारी वृत्तसेवा : कात्यायनीजवळ मोटारसायकलला जनावराने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात नवविवाहितेचा मृत्यू झाला; तर आई व भाऊ दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री उशिरा घडला.

अफरीन बुखारीचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. तिला गेल्या काही दिवसांपासून संधिवाताचा त्रास सुरू झाल्याने उपचार करण्यासाठी ती माहेरी कात्यायनी येथे आली होती. उपचारांसाठी हे तिघे सायंकाळी कोल्हापुरातील रुग्णालयात गेले होते. सोमवारी रात्री उशिरा कात्यायनीजवळ त्यांच्या दुचाकीला जनावराने जोराची धडक दिली. यामध्ये अफरीन बुखारी या महिलेचा रस्त्यावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. जुबेर काझी, फरजाना काझी (रा. कात्यायनी, ता. करवीर) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्यांच्यावर दुधाळी परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news