Kolhapur|अब्दुल लाट ग्रामपंचायतीच्या आवारात काळ्या बाहुलीसह लिंबू, नारळाचा उतारा! करणी भानामतीचा प्रकार

Black Doll and Ritual Items Found at Gram Panchayat Premises- गावात उलटसुलट चर्चांना उधाण, भ्रष्टाचाराच्या चौकशीशी संबंध असल्याची सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा
kolhapur news
Black Doll and Ritual Items Found at Gram Panchayat Premises
Published on: 
Updated on: 

अब्दुल लाट : अब्दुल लाट (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या आवारात नारळाला लाल दोऱ्याने लिंबूसह काळी बाहुली बांधून उतारा टाकून करणी भानामती करण्याचा प्रकार घडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

थेट ग्रामपंचायतीच्या परिसरातच असा प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य, भीती आणि उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. काही ठिकाणी या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नेमका हा प्रकार कोणी आणि कशासाठी केला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाची आणि लोकांच्या विश्वासाची सार्वजनिक संस्था आहे. मात्र, याच संस्थेच्या आवारात अशा प्रकारचा उतारा आढळल्याने या घटनेचे गूढ अधिकच वाढले आहे.

हा प्रकार अंधश्रद्धेतून करण्यात आला की, यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून ग्रामपंचायतीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासावे, संबंधित वेळेतील हालचालींची पडताळणी करावी आणि हा प्रकार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित यंत्रणेने या प्रकरणाचा छडा लावावा, जेणेकरून अफवा आणि भीतीचे वातावरण दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केले जात आहे.

लाखोंच्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीदरम्यान घडलेल्या प्रकाराने खळबळ

एका बाजूला अब्दुल लाट ग्रामपंचायतीच्या कारभारातील लाखो रुपयांच्या कथित गैरव्यवहारांची चौकशी चालू असताना दुसऱ्या बाजूला ही करणी भानामतीचा प्रकार थेट ग्रामपंचायतीच्या जागेतच झाल्याने सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. चौकशीच्या पार्श्वभूमीवर या प्रकारामागे नेमका कोणाचा हात आहे? याबाबतही उलटसुलट चर्चा मात्र जोरदार सुरू आहे.

kolhapur news
Gokul Election | ‘गोकुळ’मध्‍ये कोणाला संधी, कोणाचा पत्ता होणार कट?

ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी एका बाजूला सुरू असताना, दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायतीच्या आवारात असा प्रकार घडणे हा केवळ योगायोग आहे की, यामागे काही वेगळे कारण दडले आहे, याचा उलगडा होणे गरजेचे आहे. यासाठी काही जागरूक ग्रामस्थांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासाण्याची व या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

kolhapur news
Prakash Abitkar | नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य; १४०० वैद्यकीय अधिकारी पदे भरणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news