कोल्‍हापूर : शिरगावात विद्युत तारेच्या स्पर्शाने म्हशीचा मृत्यू

म्हशीचा मृत्यू
म्हशीचा मृत्यू
Published on
Updated on

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा विद्युत तारेच्या स्पर्शाने म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना शिरगाव ता. शाहूवाडी येथे (शुक्रवार) दि ७ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने शेतकऱ्याचे अंदाजे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरगाव येथील सुनील बळीराम गिरी हे स्वमालकीच्या तीन म्हैशींना चरायला व पाणी पाजण्यासाठी गावालगत असलेल्या सठवायचा ओढा येथे घेऊन गेले होते. यापूर्वीच ओढ्यांनजीक वीजवाहक तार तुटून पडली होती. यावेळी ओढ्याकडे जाताना म्हशीला तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन तीन पैकी एक म्हैस जागीच ठार झाली. या घटनेने सुनील गिरी यांचे सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाले.

मृत झालेली म्हैस दहा महिन्यांची गाभण होती. आठ दिवसांत ती व्याणार होती. तत्पूर्वी विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच येथील वायरमन गणेश पाटील व सुनील घरे यांनी घटनास्थळी येऊन त्वरित विद्युत पुरवठा खंडित करून पाहणी केली. घटनेचा पंचनामा पोलीस पाटील प्रकाश पोतदार यांनी केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news