कोल्हापूर : कडवी धरण क्षेत्रात १३५ मिमी पाऊस

कोल्हापूर : कडवी धरण क्षेत्रात १३५ मिमी पाऊस
Published on
Updated on

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत १३५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा ३६.६३ टक्के आहे. तर, मागीलवर्षी आजपर्यंत पाणलोट क्षेत्रात ७८९ मिमी पावसाची नोंद झाली होती. गतवर्षी १० ऑगस्ट रोजी धरण  १०० टक्के भरले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात ५ टक्के कमी पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उत्तम मोहिते यांनी दिली. तालुक्यात सरासरी २४ तासांत ३८ मिमी तर आजअखेर २९३ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती आपत्ती निवारण कक्षाचे प्रमुख तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली.

कडवी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असल्याने पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. धरणाच्या पाणी साठ्यात सरासरी दोन टक्क्यांनी प्रत्येक दिवशी वाढ होत आहे. १ जून ते आजअखेर धरण क्षेत्रात ६४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता ७१.२४० दलघमी (२.५१ टीएमसी) असून दरवर्षी १०० टक्के धरण भरते. गतवर्षी धरण तीनदा ओव्हर फ्लो झाले. सध्या धरणात शनिवारी  सकाळी ७ वाजता धरणाची पाणीपातळी ५८९.७० मीटर होती. पाणीसाठा २६.१० दलघमी (०.९२ टीएमसी) म्हणजेच ३६.६३ टक्के आहे. गतवर्षी याच तारखेला धरण ४२ टक्के भरले होते. धरणातून पाण्याचा विसर्ग पुर्णतः बंद करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने रोपलावणीच्या कामासाठी बळीराजाची धांदल उडाली आहे.

तालुक्यातील सहा मंडल केंद्राचा विचार करता आंबा मंडल केंद्रात सर्वाधिक ७१७ मिमी पावसाची आजअखेर नोंद झाली आहे. सर्वात कमी सरूड मंडलात पाऊस झाला आहे. आपत्ती निवारण कक्षातून दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यत २२९ मिलिमिटर पाऊस झाला असून सरासरी ३८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडलनिहाय २४ तासांत व आजअखेर कंसात पावसाच्या मिमीटरमध्ये नोंदी अशा : भेडसगाव : २६.५ (१७१), बांबवडे : १२.५ (१३०), करंजफेन : ३८७.५ (४४४), सरूड : १७ (१२७), मलकापूर : २८ (१६९), आंबा ८८ (७१७) असा एकूण  २२९ (१७५८) मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर १ जूनपासून आजअखेर एकूण पावसाची नोंद १७५८ मिमी आणि सरासरी पाऊस २९३ मिलिमीटर झाला आहे.

गेल्या २४ तासांतील कोल्हापूर धरण क्षेत्रातील पाऊस

राधानगरी धरण क्षेत्र- ८८ मिमी
दूधगंगा धरण क्षेत्र- ६७ मिमी
कुंभी धरण क्षेत्र – १०३ मिमी
पाटगाव धरण क्षेत्र- १५१ मिमी
कडवी धरण क्षेत्र- १३५ मिमी
तुळशी धरण क्षेत्र- ५१ मिमी
कासारी धरण क्षेत्र- ८८ मिमी

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news