Kolhapur Rain |पंचगंगेने धोका पातळी गाठताच शहरातील 'हे' होतात भाग जलमय

जाणून घ्या, कोल्हापूर शहरातील पंचगंगेची पातळी, पाण्याखालील बंधारे आणि पाणी येण्याची संभाव्य ठिकाणे
Kolhapur Rain Update
चगंगेची धोका पातळीकडे वाटचालFile Photo

कोल्हापूर : पंचगंगेची पाणी पातळी ४२ फूट ०१ इंच झाली असून धोक्याच्या पातळीकडे जाण्यासाठी केवळ १ फूट बाकी आहे. पंचगंगेने धोक्याची पातळी गाठताच शहरात पूरसदृश स्थिती निर्माण होते. यामुळे शहरातील पूरबाधित भागात भीतीचे सावट पसरले आहे. सुतारवाडा परिसरात पुराचे पाणी येत असल्यामुळे ४३ फूट पाणी पातळी येताच सुतारवाड्यातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यास सुरुवात झाली आहे. Kolhapur Rain Update

Kolhapur Rain Update
Manoj Jarange Patil | मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित, आता समाजामध्ये जाणार

पूरग्रस्त भागात भीतीचे वातावरण

मागील चार दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाचा मंगळवारीही जोर कायम होता. मंगळवारच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाने शहरास झोडपून काढले. अनेक सखल भागात पाणी साचल्याने रस्त्यांवर तळेसदृश स्थिती निर्माण झाली होती.

४५ फुटांवर येताच जुने शिये नाका ओढ्यावर पाणी येऊन बावडा रस्ता बंद होण्याचा धोका आहे. रिलायन्स मॉल पिछाडीस कुंभार गल्ली, कामगार चाळ, कांदा-बटाटा मार्केट, शाहूपुरी, कोंडा ओळ या परिसरात पुराचे पाणी येण्याची शक्यता असते. सध्या पाणी पातळी ४१ फुटांवर असल्याने सुतारवाडा परिसरातील नागरिकांसह संभाव्य पूरग्रस्त भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Kolhapur Rain Update
कोल्हापूरला महापुराचा धोका; ‘अलमट्टी’तून विसर्ग वाढवा

कोल्हापूर शहरातील पंचगंगेची पातळी आणि पाणी येण्याची संभाव्य ठिकाणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली PDF फाईल ओपन करा

Attachment
PDF
पंचगंगेची पातळी आणि पाणी येण्याची संभाव्य ठिकाणे.pdf
Preview

जिल्ह्यामध्ये संततधार पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा अलर्ट ठेवली असून, पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी चारही विभागीय कार्यालयातील सर्व निवारा केंद्रे सज्ज आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याखालील बंधारे

कोल्हापूर पाणीपातळी अहवाल व पाण्याखालील बंधारे
कोल्हापूर पाणीपातळी अहवाल व पाण्याखालील बंधारे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news