कोल्हापूर : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने कागलमध्ये काहीकाळ तणाव; संशयित ताब्यात

कोल्हापूर : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने कागलमध्ये काहीकाळ तणाव; संशयित ताब्यात
Published on
Updated on

कागल; पुढारी वृत्तसेवा : येथे एका तरुणाने मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर कागल शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी जमावाला पांगवून स्टेटस ठेवणार्‍या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला. रविवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला.

शहरातील एका तरुणाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवला होता. नंतर त्याने तो डिलिट केला. मात्र त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. याबाबतची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना समजल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास तरुणांचा जमाव घोषणा देत पोलिस ठाण्याकडे आला. पोलिस ठाण्याच्या काही अंतरावरून पोलिसांनी जमाव पांगवला. यावेळी तरुणाची आणि पोलिसांची चांगलीच पळापळ झाली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. दरम्यान, खबरदारी म्हणून शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच चौकाचौकात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तसेच सायरन करत पोलिस व्हॅन गल्लीबोळातून फिरवली जात होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news