JEE Main Result 2023 : टेलरिंग व्यावसायिकाचा मुलगा जेईई मेन्समध्ये अव्वल!

JEE Main  Result 2023 : टेलरिंग व्यावसायिकाचा मुलगा जेईई मेन्समध्ये अव्वल!

धामोड : टेलरिंग व्यावसायिकाच्या मुलाने जेईई मेन्स परीक्षेत 99.16 टक्के गुण मिळवत यश प्राप्त केले आहे. धामोड (ता. राधानगरी) येथील स्वरूप जयराम धनवडे याने जेईई मेन परीक्षेत 99.16 पर्सेंटाईल गुण मिळवून तो आयआयटीसाठी पात्र झाला आहे.

घरची परिस्थिती बेताची असल्याने स्वरूपचे आई-वडील टेलरिंग व्यवसायाच्या निमित्ताने सडोली खालसा (ता. करवीर) येथे आहेत. स्वरूपचे प्राथमिक शिक्षण येथील रा. बा. पाटील विद्यालय सडोली येथे झाले. स्वरूपचे 1 ली ते 8 वी पर्यंतचे शिक्षण सडोली येथे झाले व 9 वी पासून 12 वी पर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय, सिंधुदुर्ग येथे झाले आहे.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पहिलीपासून 12 वी पर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये स्वरूप नेहमीच अव्वल राहिला. त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दक्षिणा फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली आहे. देशसेवा करण्याची प्रेरणा उराशी बाळगून दररोज वीस तास अभ्यास करणार्‍या स्वरूपला संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था व भारतीय अंतराळ संशोधन संस्थामध्ये काम करायचे असल्याची माहिती स्वरूपचे वडील जयराम धनवडे यांनी दै.'पुढारी'शी बोलताना दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news