Gas Cylinder Crisis | उदगावमध्ये गॅस वाटपाचा गोंधळ; संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक

जयसिंगपूरमधील यश गॅस एजन्सीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित
Udgaon gas distribution issue
मौजे आगर : येथील बाजार समितीच्या आवारात गॅस घेण्यासाठी उदगावच्या नागरिकांनी लावलेल्या रांगा Pudhari
Published on
Updated on

Udgaon gas distribution issue

जयसिंगपूर : उदगाव येथील गॅस वितरणात झालेल्या अनागोंदीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जयसिंगपूरमधील यश गॅस एजन्सीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, गॅसचे घरोघरी वितरण न करता नागरिकांना आगर (ता. शिरोळ) येथील जयसिंगपूर बाजार समितीच्या आवारात गॅस घ्यायला बोलावले जात आहे.

उदगाव ते बाजार समिती हे सुमारे ३ किलोमीटर अंतर असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराकडे शिरोळ पुरवठा विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून केला जात आहे. बुधवारी संतप्त नागरिकांनी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली.

Udgaon gas distribution issue
Kolhapur News : जागा महापालिकेची, अतिक्रमण दुसऱ्याचे अन्‌‍ हप्ता घेतो तिसराच!

नियमांनुसार गॅस सिलिंडरचे घरोघरी वितरण करणे आवश्यक असताना, गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांना सकाळी लवकर रांगेत उभे राहून गॅस घ्यावा लागत आहे. सकाळी ६ वाजल्यापासून रांगा लागूनही उशिरापर्यंत वितरण न झाल्याने नागरिकांचा संताप वाढला. तसेच घरपोच सेवा न देता देखील ९१५ रुपये पूर्ण आकारले जात असल्याने नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला.

दरम्यान, “उदगावमध्येच गल्लोगल्ली गॅस वितरण सुरू न केल्यास एजन्सीवर मोर्चा काढू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण यांनीही एजन्सीला गावातच गॅस वाटप करण्याच्या सूचना दिल्या.

Udgaon gas distribution issue
Kolhapur Crime : तरुण हॉकी खेळाडूने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

घटनास्थळी आलेल्या एजन्सी मालक देसाई यांनी कर्मचाऱ्यांना सुनावणी करत, उद्यापासून उदगावमध्ये घरपोच गॅस वितरण सुरू करण्याचे आदेश दिले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, बाजार समितीच्या आवारात गॅस वाटप सुरू असल्याने संभाव्य अपघाताची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.तसेच या प्रकरणाची माहिती शिरोळ तालुका पुरवठा अधिकारी वैशाली माळी यांनाही देण्यात आली असून पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

गॅस एजन्सीकडून घरोघरी वितरण करणे बंधनकारक आहे. अन्यत्र बोलावूनही घरपोच शुल्क आकारले असल्यास ग्राहकांनी पावतीसह तक्रार करावी.

- मोहिनी चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news