

जयसिंगपूर : ट्रेंडीग कंपनीमध्ये गुंतवणूक करतो असे सांगून ८१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रेणीक दत्तात्रय गुरव (रा. ग्रीन व्हॉली अपार्टमेंट, स्टेशन रोड, जयसिंगपूर) याच्यावर जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद विजय बाळासाहेब माणगावे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी श्रेणीक गुरव याला जयसिंगपूर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली आहे.
याबाबत जयसिंगपूर पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, श्रेणीक दत्तात्रय गुरव यांने विजय बाळासाहेब माणगावे यांना चांगल्या परताव्याचे अमिष दाखवुन त्यांना त्याचे समर्थ ट्रेडींग अँड सव्हींसेस या ट्रेडींग कंपनीमध्ये एकुण ९१ लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले. त्यातील १० लाख रुपये विजय माणगावे यांना परत केली. मात्र, राहीलेली ८१ लाख रुपये रक्कम आणि त्यावरील परतावा न देता त्यांची फसवणुक केल्याची घटना ४ ऑगस्ट २०२३ ते १६ मे २०२४ या कालावधीत समर्थ ट्रेडींग अँड सव्हींसेस या जयसिंगपूर कार्यालयात घडली. सातत्याने दिलेली रक्कम मागणी करूनही फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतच अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण माने करीत आहेत.