Kolhapur Crime | कोथळी येथे ऊसतोड कामगारांच्या पालावरून तरुणीचे अपहरण; परिसरात खळबळ

मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू
Kidnapped
Kidnapped Pudhari
Published on
Updated on

Jaysingpur Kothali Sugarcane Worker Daughter Kidnapped

जयसिंगपूर : कोथळी (ता.शिरोळ) येथे जालना जिल्ह्यातून ऊसतोडीच्या निमित्ताने आलेल्या आणि सध्या कोथळी हद्दीत शेत पालावर वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील अठरा वर्षांच्या युवतीचे मंगळवारी (दि.१०) दुपारी सुमारे एकच्या सुमारास अपहरण झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

युवतीला गाडीतून पळवून नेण्यात आल्याचे सांगण्यात येत असून संबंधित वाहन दानोळीच्या दिशेने गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

Kidnapped
Kolhapur Crime | निवडणूक निकालानंतर दत्तवाडात तणाव; झोपडपट्टी दादांची दहशत! युवकांना बेदम मारहाण

या घटनेची माहिती कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. अपहरणाच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पोलिसांची तपास चक्रे गतिमान झाली आहेत.

हा प्रकार हा अपहरणाचा आहे की अन्य कोणता प्रकार आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. लवकरच घटनेचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे कोथळीसह परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news