International Cricket Stadium | आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची उभारणी पाच वर्षांत होईल : संभाजीराजे

तज्ज्ञ तांत्रिक समितीकडून आराखडा : बीसीसीआय, एमसीएच्या विविध योजना; उद्योजकांच्या आर्थिक पाठबळासाठी पाठपुरावा सुरू
International Cricket Stadium |
International Cricket Stadium | आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची उभारणी पाच वर्षांत होईल : संभाजीराजे
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापुरातील विकासवाडी (ता. करवीर) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक ३२ एकर जमीन राज्य शाससाने जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (केडीसीए) दिली आहे. तांत्रिक समितीच्या वतीने या मैदानाचा पुरेपूर आराखडा तयार झाल्यानंतर पुढील ५ वर्षांत मैदानाच्या उभारणीस सुरुवात होईल. यासाठी ‘बीसीसीआय’ व ‘एमसीए’च्या विविध योजनांबरोबरच उद्योजकांच्या आर्थिक पाठबळासाठी पाठपुरावा सुरू झाल्याची माहिती अध्यक्ष संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘आयसीसी’ व ‘बीसीसीआय’ यांच्या निकषांनुसार आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत असे स्टेडियम कोल्हापुरात उभारण्यात येणार आहे. ‘बीसीसीआय’ व ‘एमसीए’च्या विविध योजनांचे पाठबळ मिळावे, यासाठी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि कोल्हापुरातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच, मैदान परिपूर्ण होण्यासाठी देशभरातील आणि विदेशातील मैदानांची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली.

स्टेडियममुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या क्रीडा पर्यटनाला व स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून, यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे यांनी दिली. पुढील २५ वर्षांचा विचार करून सर्व प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असून, यासाठी क्रीडा विभागाचे सर्वोतोपरी सहकार्य असेल, अशी ग्वाही क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी दिली. पत्रकार परिषेदेला चेतन चौगुले, अभिजित भोसले, मदन शेळके, शीतल भोसले, अजित मुळीक, डाॅ. संजय पाठारे, कृष्णा धोत्रे आदी उपस्थित होते.

१५ एकरांत स्टेडियम, १७ एकरांत मल्टी स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स

क्रिकेट स्टेडियम १५ एकरांत, तर उर्वरित १७ एकरांत मल्टी स्पोर्टस्‌ कॉम्प्लेेक्स उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी दिली. स्टेडियम अंतर्गत आधुनिक पॅव्हेलियन, इनडोअर प्रशिक्षण सुविधा, सराव मैदाने, स्पोर्टस्‌ सायन्स सेंटर, क्लब हाऊस, फ्लड लाईट, क्रिकेट म्युझियम, सौरऊर्जा प्रकल्प व आधुनिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कोल्हापुरातील नामांकित तज्ज्ञ व अनुभवी अभियंता यांची तांत्रिक समिती लवकरच तयार करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news