Panipat : पानिपतमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना

Panipat : पानिपतमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
Panipat : पानिपतमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : Panipat : पानिपतमधील बसताडा गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

पानिपतमधील रोड मराठा समाजासोबत महाराष्ट्राचा स्नेह वाढावा या हेतूने भोर (पुणे) येथील शिवभक्तांनी हा पुतळा दिला असून मराठा जागृती मंचकडून यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

पुतळ्याची प्रतिष्ठापना पानिपत येथे रोड मराठा समाजाचे नेते व अखिल भारतीय मराठा जागृती मंचचे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र मराठा आणि स्थानिक आमदार हरविंदर कल्याण यांच्या हस्ते झाले.

मराठी जागृती मंचाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख मिलिंद पाटील (कोल्हापूर) यांच्यासह पानिपत कर्नाल परिसरातील रोड मराठे यावेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मावळ विभागाचे शिवभक्तांनी पानिपतच्या तिसर्‍या लढाईतील मराठी सैनिकांच्या वंशजांना बंधू प्रेमाचा संदेश या माध्यमातून दिला आहे.

260 वर्षानंतर पानिपत येथील रोड मराठा महाराष्ट्राला जोडून देण्याचे काम विरेंद्र मराठा व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे यांनी केले आहे.

दरवर्षी अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतच्या माध्यमातून पानिपत येथे मराठा शौर्य दिन साजरा होता.

महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यातील मावळे या शौर्य दिनासाठी हजेरी लावतात. या पार्श्वभूमीवर भोरसह व पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा 10 फूट उंचीचा पुतळा बसताडा या गावी प्रतिष्ठापन करण्यासाठी दिला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन स्वामी ब्रम्हानंद युवा कमेटी गाव बसताडा या माध्यमातून करण्यात आले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news