राजारामपुरीत ‘पीटर इंग्लंड’ भव्य शोरूमचे उद्घाटन

राजारामपुरीत ‘पीटर इंग्लंड’ भव्य शोरूमचे उद्घाटन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राजारामपुरी दुसर्‍या गल्लीत नव्याने सुरू झालेल्या पीटर इंग्लंड ब्रँडेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असणार्‍या शोरूमचे उद्घाटन दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते फीत व केक कापून करण्यात आले. याप्रसंगी आदित्य बिर्ला ग्रुपचे संचालक रवी गुप्ता, शोरूमचे मालक सतीश माने, माजी महापौर सागर चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पीटर इंग्लंड हा भारतातील विश्वसनीय मोठा ब्रँड आहे. राजारामपुरीत याचे दोन मजली शोरूम सुरू झाले आहे. उद्घाटनानंतर डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी शोरूमची पाहणी करीत माहिती जाणून घेतली. हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम झाले आहे. या ठिकाणी फॉर्मल कपड्यांबरोबरच टू-पीस, थ्री -पीस, जीन्स, टी-शर्ट उपलब्ध आहेत. होजिअरीसह विविध प्रकारचे बेल्टस्, वॉलेटस्, टायज आहेत. खास लग्नासाठी विशेष सूट, जोधपुरी, इंटो वेस्टर्न, सिंगल, थ्री-पीस ब्लेजरची असंख्य व्हरायटी उपलब्ध आहे.

यावेळी श्रीमती शीला माने, सोनाली माने, संगीता माने, प्रणव माने, यशराज माने, देविका तुपे, आर्या माने, शिवाजी लायकर, अभय देसाई, झोनल मॅनेजर अजित राजमाने, एरिया मॅनेजर योगेश प्रभाकर, धर्मेंद्रसिंग, मोहम्मद साजिद, साबीर हुसेन यांच्यासह माने कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news