कुरूंदवाड
कुरूंदवाड

कुरूंदवाडकरांकडून जलकुंभात गणेश विसर्जन; निर्माल्‍य दानाला प्रतिसाद

Published on

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' असा निरोप देत जड अंत:करणाने कुरुंदवाड नगरीत पाच दिवसांच्या घरगुती गणपती व गौरीच्या विसर्जनास आज (मंगळवार) सुरूवात झाली. विसर्जनासाठी पालिका प्रशासनाने शहरात ४ ठिकाणी जलकुंभ उभारत भक्तांना मूर्तीदानासाठी आवाहन केले आहे.

दरम्यान, कुरुंदवाडचे सुपुत्र सांगलीचे माजी महापौर नितीन सावगावे यांनी पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जलकुंभात विसर्जन विधी पार पाडत मूर्तीदान केली. इतरांनीही मूर्तीदान करावे, असे त्‍यांनी आवाहन केले. मूर्ती व निर्माल्य दानला नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी व्यक्त केली.

सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतले आहेत. पालिकेतर्फे शहरात सन्मित्र चौक, पालिका चौक, शिवतीर्थ चौक व भैरववाडी व्यायाम शाळेजवळ गणेश विसर्जन कुंड, काहिली व निर्माल्य कुंडची व्यवस्था करण्यात आली आहे.पालिका प्रशासनाने तयार केलेल्या कृत्रिम जलकुंडात मूर्ती विसर्जित करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. श्री मूर्ती दान करून भक्तांनी 'पंचगंगा बचावासाठी' खारीचा वाटा उचलला. तर पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण पाहता विसर्जनाच्या ठिकाणी नागरिकांनी जबाबदारी ओळखून निर्माल्य नदीत विसर्जित न करता निर्माल्यकुंभात एकत्रित दान करण्यावर भर दिला. यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेला बळ दिल्‍याचे दिसून आले.

आज विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनने वाहतूक आराखडा तयार केला आहे. शहरातील वाहतूक बाह्यवळण मार्गावरून वळवली आहे. त्यामुळे भाविकांची तसेच विसर्जन मार्गावर कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. दान केलेल्या गणेशमूर्ती पालिकेच्यावतीने एकत्र करून सरकारी विहिरीत विसर्जन करण्यात येणार आहेत.कुरुंदवाड पालिकेने मूर्तिदानची संकल्पना केली आहे. पंचगंगा अनवडी नदी, कृष्णा घाट व भैरववाडी पुलाजवळ मूर्तिदानासाठी कर्मचारी व वाहने नियुक्त करण्यात आली आहेत. दरम्यान, शहरातील नागरिकांनी मूर्तीदानाच्या संकल्पनेत सहभाग नोंदवून मूर्तीदान करावे, असे आवाहन सांगलीचे माजी महापौर नितीन सावगावे यांनी केले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news