Prakash Abitkar | पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली राधानगरी धरणाला भेट

धरणाच्या रेडिएल गेटच्या जागेची केली पाहणी, सेवाद्वारांना बसवण्यात येणाऱ्या हायड्रोलिक व्हॉईस्टच्या कामाची घेतली माहिती
Prakash Abitkar visit Radhanagari Dam
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी धरणस्थळी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. (Pudhari Photo)
Published on
Updated on

Prakash Abitkar visit Radhanagari Dam

कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज (दि.५) राधानगरी धरणाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी राधानगरी धरणावर नव्याने बसवण्यात येणाऱ्या रेडिएल गेटच्या जागेची पाहणी केली. तसेच सर्व्हिस गेट क्रमांक 3, 4 व 5 ला हायड्रोलिक व्हॉईस्ट बसवण्याबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी महाजनकोचे जुने जल विद्युत केंद्र (पॉवर हाऊस) पुन्हा सुरु करण्याबाबत जलसंपदा व महाजनकोच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, महाजनकोचे पॉवर हाऊस इन्चार्ज जाधव व कानेकर, राधानगरी कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

Prakash Abitkar visit Radhanagari Dam
Kasari Dam | 'कासारी'त गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा; धरण ७४ टक्के भरले

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पंचगंगा व कृष्णा नदीला महापूर येतो. महापुराची कारणे पडताळून उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेकडून एमआरडीपी या प्रोजेक्ट मधून सध्या सर्व्हेचे काम सुरु आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून राधानगरी धरणाच्या अस्तित्वात असणाऱ्या सेवा दरवाजांना हायड्रोलिक व्हॉईस्ट बसवण्यात येणार आहे, जेणेकरुन धरणात येणाऱ्या पाण्याचा महापुरापूर्वीच विसर्ग करुन अतिरिक्त पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा धरणात साठा करून ठेवणे शक्य होईल. अतिवृष्टीवेळी धरणातून विसर्ग राहणार नाही, अशी उपाययोजना करण्यासाठी धरणाच्या सेवा द्वाराना हायड्रोलिक व्हॉईस्ट बसवण्यात येणार आहे.

धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून अस्तित्वात असणाऱ्या स्वयंचलित दरवाजांच्या सांडव्या व्यतिरिक्त एक अतिरिक्त सांडव्याच्या ठिकाणी तीन रेडिएल गेट बसवण्यात येणार आहेत. हे गेट स्वयंचलित दरवाजा व मुख्य धरण यांच्या मधील जागेत बसवण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्यावेळी धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करणे शक्य होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news