Gokul News | 'गोकुळ'च्या 1200 दूध संस्थांबाबतची सुनावणी आठवडाभर लांबणीवर; मतदार यादी व निवडणूक प्रक्रिया स्थगित?

गोकुळ दूध संघाशी संबंधित 1200 प्राथमिक दूध संस्थांच्या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील सुनावणी पुन्हा एक आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली
Gokul Milk Union
Gokul Milk Union Pudhari
Published on
Updated on

Gokul 1200 Milk Societies Hearing

आशिष पाटील

गुडाळ : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाशी संबंधित 1200 प्राथमिक दूध संस्थांच्या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील सुनावणी पुन्हा एक आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमही लांबण्याची शक्यता आहे.

शनिवारी (दि. 7) झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारी वकिलांना 1200 संस्थांच्या अवसायनासंदर्भातील आदेशाला स्थगिती देण्याबाबत मंत्र्यांकडून मंत्रालयात झालेला पत्रव्यवहार सोमवारी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले होते.

Gokul Milk Union
Gokul News |'गोकुळ' निवडणूक लांबणीवर पडणार? मंगळवारच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष

मात्र, हा पत्रव्यवहार सादर करण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याने सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे एक आठवड्याची मुदत देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्यामुळे या प्रकरणातील पुढील सुनावणी आठवडाभर लांबणीवर पडली आहे.

दरम्यान, गोकुळशी संलग्न प्राथमिक दूध संस्थांकडून ठराव मागवून मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया देखील यामुळे पुढे ढकलली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाची निवडणूक नियोजित वेळेत होणार का, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news