Gokul Election | 'गोकुळ'साठी तालुक्याच्या ठिकाणी मतदान; मतमोजणी कोल्हापुरात!

बाराही तालुक्यांत ३५ मतदान केंद्रांची व्यवस्था; ५,४१८ मतदार बजावणार हक्क
Gokul Election Voting
Gokul Election VotingPudhari
Published on: 
Updated on: 

Gokul Election Voting

आशिष पाटील

गुडाळ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. येत्या १८ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, जिल्ह्यातील बाराही तालुक्यांच्या ठिकाणी मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ५,४१८ मतदारांना ३५ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. दरम्यान, १९ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी होणार आहे.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तालुकानिहाय केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. आजरा तालुक्यात व्यंकटराव हायस्कूल येथे ३०५ मतदारांसाठी दोन केंद्रे, करवीर तालुक्यात स्वामी विवेकानंद कॉलेज, नागाळा पार्क येथे ८६५ मतदारांसाठी चार केंद्रे आणि कागल तालुक्यात जवाहर नवोदय विद्यालय, सांगाव रोड येथे ६१९ मतदारांसाठी चार केंद्रे असतील.

Gokul Election Voting
Gokul Election | मंत्री मुश्रीफ यांच्याकडून महायुती पॅनेलची घोषणा

गगनबावडा तालुक्यात माधव विद्यालय येथे १३१ मतदारांसाठी एक केंद्र, गडहिंग्लजमध्ये महाराणी ताराराणी हायस्कूल येथे ३९९ मतदारांसाठी तीन केंद्रे, तर चंदगडमध्ये कुमार विद्या मंदिर येथे ४२३ मतदारांसाठी तीन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पन्हाळा तालुक्यात फोर्ट इंटरनॅशनल अकॅडमी, वाघबीळ येथे ५१३ मतदारांसाठी तीन केंद्रे, भुदरगडमध्ये शाहू कुमार भवन, गारगोटी येथे ५९३ मतदारांसाठी चार केंद्रे, तर राधानगरीत राजर्षी शाहू विद्यालय येथे ६९९ मतदारांसाठी चार केंद्रे असतील.

शाहूवाडी तालुक्यात श्री शाहू हायस्कूल येथे ४४० मतदारांसाठी तीन केंद्रे, शिरोळमध्ये पद्माराजे हायस्कूल येथे २७० मतदारांसाठी दोन केंद्रे, तर हातकणंगलेमध्ये आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल येथे १६१ मतदारांसाठी एक मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे.

Gokul Election Voting
Gokul Election | बंडखोरी, ताणतणावाने गाजला माघारीचा शेवटचा दिवस; ‘गोकुळ’साठी दुरंगी लढत

ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक

मतदानासाठी येताना मतदारांनी महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार ओळखीचा वैध पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. यासाठी आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा वाहन चालविण्याचा परवाना यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी जाताना आवश्यक ओळखपत्र सोबत ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news