Gokul Election | गोकुळ निवडणूक : न्यायालयीन लढाईत यशस्वी झालेले मंत्री मुश्रीफ जागावाटपाच्या तहातही बाजी मारणार?

गोकुळच्या जागावाटपाचा तिढा; मुंबईतील बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष
Gokul  Seat Sharing Meeting
Hasan Mushrif Pudhari
Published on: 
Updated on: 

Mahayuti Gokul Seat Sharing Meeting Mumbai

आशिष ल. पाटील

गुडाळ :

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. हा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज रात्री मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी महायुतीच्या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

गेल्या चार महिन्यांपासून गोकुळच्या ठरावांवरून शासकीय आणि न्यायालयीन पातळीवर लढा देत यश मिळविलेले मंत्री हसन मुश्रीफ आता जागावाटपाच्या चर्चेत आपली भूमिका कितपत प्रभावीपणे मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. गोकुळच्या जागावाटपाचा आधार ठरावांची संख्या असावा, असा आग्रह मुश्रीफ यांचा असल्याचे सांगितले जाते. तर भाजपमधील एका गटाकडून पक्षीय ताकदीच्या आधारे जागावाटप करण्याची भूमिका मांडली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत कोणता तोडगा निघतो, याची उत्सुकता आहे.

Gokul  Seat Sharing Meeting
Gokul Election 2026 | गोकुळ उद्योगपतींच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव हाणून पाडा : सतेज पाटील

गोकुळच्या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने मेळावे आणि प्रचारदौरे सुरू करून प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र, महायुतीतील घटक पक्षांचा जागावाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

राष्ट्रवादी आणि भाजपमधील गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला सुप्त संघर्ष चार दिवसांपूर्वी भाजपच्या जिल्हा कार्यालयातील बैठकीत उघडपणे समोर आला. त्यामुळे जागावाटपानंतर प्रत्यक्ष प्रचारात घटक पक्षांमध्ये समन्वय कसा साधला जातो, यावर महायुतीच्या निवडणूक रणनीतीचा परिणाम होणार आहे.

Gokul  Seat Sharing Meeting
Gokul Election : ‘गोकुळ’चा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; ‘वर्षा’वर आज महायुतीच्या नेत्यांची बैठक

आजच्या बैठकीत निर्वाचित, स्वीकृत आणि शासन नियुक्त अशा एकूण २८ जागांच्या वाटपासह पाच वर्षांच्या अध्यक्षपदाच्या रोटेशनबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. सर्वमान्य तोडगा न निघाल्यास गोकुळ निवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय समीकरणांची आणि आघाड्यांची शक्यता निर्माण होऊ शकते.

logo
Pudhari News
pudhari.news