Gokul Milk Rate: गोकुळच्या इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; म्हैस दूध विक्री दरात तब्बल 6 रुपयांची वाढ

Gokul Milk Price Hike
Gokul Milk Price Hike File Photo
Published on: 
Updated on: 

Gokul Milk Rate: नुकतेच नवीन संचालक मंडळ आणि चेअरमन निवड झालेल्या गोकुळने दूध विक्री दरवाढीचा उच्चांक गाठत सामान्यांच्या खिशाला चांगलाच लोड दिला आहे. गोकुळ दूध संघाने म्हैस दूध विक्री दरात तब्बल ६ रूपयांची वाढ केली आहे. तर म्हैशीच्या दूध खरेदी दरात ३ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. नवीन दूध दरवाढ ही शनिवारपासून लागू होणार आहे.

दुसरीकडे गाईच्या दूध खरेदी दरात २ रूपयांची वाढ करण्याचा निर्णय गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला आहे.तर गाईचे दूध खरेदी दर प्रती लिटर ४ वाढ झाली आहे. गोकुळला झालेली 70 कोटींची तूट भरून काढण्यासाठी केली दूध विक्री दरात मोठी वाढ करण्यात आलचं सांगण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात दुधाची उपलब्धता पाहून पुन्हा एकदा दर वाढवण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.

Gokul Milk Price Hike
Gokul Milk Price Hike | ‘गोकुळ’ म्‍हैस दूध विक्री दरवाढ शनिवारपासून

गोकुळच्या दरात शहरानुसार झालेली वाढ

  • कोल्हापूर - आधीचा म्हैंशीच्या दुधाचा दर ७२ रूपये लीटर होता. आता तो ७८ रूपये करण्यात आला आहे

  • कोकण - कोकणात म्हैंशीच्या दुधाचा दर ७६ रूपये लीटर होत. आता तो ८२ रूपये लीटर झाला आहे.

  • पुणे - पुण्यात म्हैंशीच्या दुधाचा दर ७८ रूपये लीटर होत. आता तो ८४ रूपये लीटर झाला आहे.

  • मुंबई- मुंबईत म्हैंशीच्या दुधाचा दर ७८ रूपये लीटर होत. आता तो ८४ रूपये लीटर झाला आहे.

Gokul Milk Price Hike
Gokul Dairy | ‘गोकुळ’च्या पहिल्याच बैठकीत खुर्च्यांवरून खडाजंगी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.