Gokul Milk Price Hike | ‘गोकुळ’ म्‍हैस दूध विक्री दरवाढ शनिवारपासून

कोल्‍हापूर ७६, पुणे-मुंबईत ८२ रुपये लिटर
Gokul Milk Price Hike |
Gokul Milk Price Hike | ‘गोकुळ’ म्‍हैस दूध विक्री दरवाढ शनिवारपासूनPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ ‘गोकुळ’ने म्‍हैस दूध विक्री दरात प्रतिलिटर चार रुपये दरवाढ करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यानुसार कोल्‍हापूरला ७६, तर पुणे-मुंबईचा म्‍हैस दुधाचा सुधारित विक्री दर ८२ रुपये प्रतिलिटर असणार आहे. ही दरवाढ शनिवार (दि. २१) पासून लागू होणार आहे. म्‍हैस दूध खरेदी दरातही प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्‍याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. दूध दरवाढीबाबत अध्‍यक्ष राजेश पाटील गुरुवारी (दि. १९) घोषणा करण्‍याची शक्‍यता आहे.

वितरकांची समजूत काढणार

पुणे, मुंबईतील सर्वच दूध संघांच्‍या वितरकांनी विक्री मार्जिनमध्‍ये वाढ करण्‍याची मागणी केली होती. मागणी मान्‍य न केल्‍यास १ डिसेंबरपासून दूध विक्री बंद करण्‍याचा इशारा दिला होता. दरम्‍यान, ‘गोकुळ’च्‍या संचालकांनी मंगळवारी मुंबईत वितरकांची भेट घेतली. सध्‍या दुष्‍काळाची परिस्‍थिती असल्‍याने परिस्‍थिती आव्‍हानात्‍मक आहे. त्‍यामुळे चार महिने सहकार्य करा. त्‍यानंतर तुमच्‍या मागणीबाबत सकारात्‍मक विचार करू, असे आश्‍वासन देत वितरकांची समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न संचालकांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.