Gokul Election 2026|सलग दोन दिवसात एकाही उमेदवाराची माघार नाही! आजपासून तीन दिवस सुट्टी!

गोकुळ : सलग दोन दिवसात एकाही उमेदवाराची माघार नाही! आजपासून तीन दिवस सुट्टी!
Gokul Election |
Gokul Election |
Published on: 
Updated on: 

गुडाळ (राधानगरी) : गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची छाननी होऊन अर्ज माघारीचे आठ दिवस उलटले. तरी गुरुवार अखेर 240 उमेदवारापैकी केवळ चारच उमेदवारांनी अर्ज माघार घेतली. गेले दोन दिवस तर एकही उमेदवार अर्ज माघारीसाठी फिरकलेला नाही. आजपासून सलग तीन दिवस निवडणूक कार्यालयाला सुट्टी आहे. त्यामुळे शेवटच्या चार दिवसात अर्ज माघारीची झुंबड उडणार आहे.

Gokul Election |
Kolhapur | महसूल न्यायाधीकरणाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापण्‍याच्‍या हालचाली

पॅनल निश्चितीचे चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत उमेदवार अर्ज माघारीसाठी अनुत्सुक असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे इच्छुक उमेदवारांच्या डमी उमेदवारांचेही अर्ज माघार घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे एकेक उमेदवाराच्या घरचे दोन-दोन, तीन- तीन अर्ज तसेच ठेवण्यात आले आहेत.

आता अर्ज माघारी साठी सोमवारपासून केवळ चारच दिवस उरले असून पॅनल जाहीर केल्यानंतर उर्वरित इच्छुकांना अर्ज माघार घ्यायला लावताना दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांची दमछाक होणार आहे.

Gokul Election |
Gokul Dairy Election | एक आमदार असलेली राष्ट्रवादी जिल्‍ह्यात महायुतीत ठरतेय भारी!

निवडणुकीच्या आघाड्यांची अंतिम रचना अद्याप दृष्टिक्षेपात नाही. विशेषता महायुती पुरस्कृत आघाडीच्या जागा वाटपाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्राथमिक बैठक झाली. मात्र शिवसेनेतील एका आमदारांना अपेक्षित जागा मिळत नसल्याने ते नाराज आहेत. त्यातच अनुसूचित जागेच्या उमेदवारीचा गुंता वाढला आहे.

आरक्षित पाच जागा पैकी दोन जागा राष्ट्रवादीला, दोन जागा भाजपला आणि एक जागा शिवसेनेला देण्यात येणार असल्याचे समजते. शिवसेने अंतर्गत येणारी ही राखीव जागा नरके गटालाच घ्यावी लागेल अशी परिस्थिती आहे.

गुरुवार अखेर गटवाईज शिल्लक उमेदवार संख्या अशी कंसात उमेदवार संख्या, सर्वसाधारण गट (145), इतर मागासवर्गीय गट (37), महिला राखीव गट (33), विमुक्त जाती -भटक्या जमाती (12), अनुसूचित जाती जमाती (9).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news