Gokul Chairman : 'गोकुळ' अध्यक्षपदासाठी शिंदेसेनेच्या अजित नरकेंचे नाव चर्चेत! महायुतीत जोरात हालचाली; मंगळवारी अंतिम घोषणा

’गोकुळमध्ये महायुतीचाच अध्यक्ष होणार! कार्यकर्त्यांनी जल्लोषासाठी तयार राहावे’
Gokul Chairman : 'गोकुळ' अध्यक्षपदासाठी शिंदेसेनेच्या अजित नरकेंचे नाव चर्चेत! महायुतीत जोरात हालचाली; मंगळवारी अंतिम घोषणा
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या होत असून या निवडणुकीत गोकुळचा नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळवर महायुतीचा आणि त्यातही शिंदे यांच्या शिवसेनेचा पहिला अध्यक्ष करण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके यांच्या नावाची जोरदार चर्चा असून, आणखी एका नावाचीही चर्चा सुरू आहे. मात्र, दुसऱ्या उमेदवाराचे नाव अद्याप गुलदस्त्यात असून अधिकृत घोषणा उद्या महायुतीचे नेते बैठक घेऊन करणार आहेत.

केडीसी बँकेत महायुतीची महत्त्वाची बैठक

सोमवारी (दि. ९) सायंकाळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसी बँक) येथे महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, केपी पाटील, संजय मंडलीक यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नेत्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मंगळवारी गोकुळवर महायुतीचाच अध्यक्ष होणार आहे. तसेच शासन नियुक्त चार संचालक देखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत.

Gokul Chairman : 'गोकुळ' अध्यक्षपदासाठी शिंदेसेनेच्या अजित नरकेंचे नाव चर्चेत! महायुतीत जोरात हालचाली; मंगळवारी अंतिम घोषणा
Gokul Chairman Election : गोकुळची सत्ता महायुतीकडेच; अध्यक्ष निवडीपूर्वी हसन मुश्रीफ यांचा सतेज पाटलांवर प्रहार

आक्रोश मोर्चा आणि कोरमच्या मुद्द्यावर मुश्रीफांचे प्रत्युत्तर

आज एकीकडे समविचारी आघाडीने आक्रोश संघर्ष मोर्चा काढला होता, त्यावरही महायुतीच्या बैठकीत चर्चा झाली. पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, "सतेज पाटील हे शेतकऱ्यांना कोरमचा मुद्दा सांगत नाहीत. कोरम जर पूर्ण होत नसेल तर आम्हाला विरोधात बसण्याचे मॅडेट मिळालेले आहे; त्यांचा अध्यक्ष बनवण्यासाठी सभेला जाऊन मदत करण्याचे मॅडेट मिळालेले नाही. त्यामुळे आम्ही बैठकीला गेलो नाही आणि सभा तहकूब झाली. अशाच प्रकारे वारंवार सभा तहकूब झाल्या असत्या तर गोकुळवर प्रशासक नेमण्याची वेळ आली असती. गोकुळ चांगला चालावा म्हणूनच शासनाने हस्तक्षेप करून चार शासन नियुक्त संचालक नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार दिला."

Gokul Chairman : 'गोकुळ' अध्यक्षपदासाठी शिंदेसेनेच्या अजित नरकेंचे नाव चर्चेत! महायुतीत जोरात हालचाली; मंगळवारी अंतिम घोषणा
Vivekanand Patil Speech: गोकुळवर 'चोरमन' नको तर 'चेअरमन' हवा... विवेकानंद पाटलांची गोकुळच्या संघर्ष मोर्चात तुफान बॅटिंग

शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मंगळवारी गोकुळमध्ये महायुतीचाच अध्यक्ष होणार असून कार्यकर्त्यांनी जल्लोषासाठी तयार राहावे, असा विश्वासही नेत्यांनी व्यक्त केला आहे. उद्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.