Bison Attack Kolhapur | उखळू येथे गव्याने शेतकऱ्याला धडक देत शिंगाने उचलून जमिनीवर आपटले

शेतात मक्याच्या पिकाची राखण करताना शेतकऱ्याला पाठीमागून धडक देत शिंगाने उचलून जमिनीवर आपटले
Farmer injured in wild animal attack
तुकाराम वडामPudhari
Published on
Updated on

Farmer injured in wild animal attack

बांबवडे : उखळू (ता. शाहूवाडी) गावातील शेतकरी तुकाराम चंद्रु वडाम (वय ६८) यांच्यावर गवा रेड्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि.२८) सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतात घडली.

तुकाराम वडाम हे आपल्या शेतात मक्याच्या पिकाची राखण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी झुडपांच्या आड लपून बसलेल्या गव्याने अचानक त्यांच्या मागून हल्ला केला. अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यात गव्याने जोराची धडक देत त्यांना खाली पाडले. त्यानंतर शिंगांनी उचलून जमिनीवर आपटत त्यांना गंभीर जखमी केले.

Farmer injured in wild animal attack
Kolhapur unseasonal rain | कोल्हापुरात अवकाळीचा मारा; शहरात तीन ठिकाणी वीज कोसळली

या हल्ल्यात वडाम यांच्या पायाला, मानेस तसेच पाठीच्या कण्याला जबर मार लागला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत करत त्यांना उपचारासाठी शित्तूर वारूण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, या परिसरात गव्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news