Kolhapur unseasonal rain | कोल्हापुरात अवकाळीचा मारा; शहरात तीन ठिकाणी वीज कोसळली

राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, करवीर, शाहूवाडीत गारांचा वर्षाव
Kolhapur unseasonal rain
विशाळगड ः परिसरात वादळी पावसासह गारांचा वर्षाव झाला.
Published on
Updated on

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्याला वादळी पावसाने शुक्रवारी झोडपून काढले. दिवसभर उन्हाचा तडाखा जाणवत होता. सायंकाळनंतर अचानक नभ दाटून आले आणि सोसाट्याचा वारा सुटला. काही वेळातच विजांच्या कडकडाटासह शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात तीन ठिकाणी वीज कोसळल्याने नारळाच्या झाडांना आग लागली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही जोरदार पावसासह गारांचा वर्षाव झाला. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारपर्यंत पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने सोमवारी व मंगळवारी ‘यलो अलर्ट’ दिला आहे. राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, करवीर, शाहूवाडीसह अन्य तालुक्यांत पावसासह गारांचा वर्षाव झाला.

येथे कोसळली वीज...

फुलेवाडी दुसरा बसस्टॉपजवळील नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाने पेट घेतला. याशिवाय लिंगम कॉलनी संभाजीनगर येथेही नारळाच्या झाडावर वीज कोसळली. जयंती नाला पंपिंग हाऊसजवळ वीज कोसळल्याने कचरा आणि परिसरात ठेवलेल्या वायरने पेट घेतला. मरळी (ता. पन्हाळा) येथेदेखील नारळाच्या झाडावर वीज कोसळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news