कोल्हापूर : गेले दहा दिवस मांगल्याचा सण असलेल्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू होती. मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने मंडळांच्या वतीने बाप्पांना निरोप दिला जाणार आहे. महापालिका अन् पोलिस प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे. महापालिकेने तब्बल अडीच हजारांवर कर्मचारी तैनात केले आहेत. मिरजकर तिकटी, महाद्वार रोड या पारंपरिक मुख्य मार्गासह सार्वजनिक मंडळांसाठी तीन मार्ग तयार करण्यात आले आहेत. इराणी खणीतच गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पंचगंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन करू दिले जाणार नाही. पंचगंगा नदीघाटाकडे जाणारा मार्ग बॅरिकेडस् लावून अडविण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने 12 ते 17 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात लेसर लाईट वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळांना लेसर लाईटची ‘झापुक झुपूक’ दाखविता येणार नाही; अन्यथा त्या मंडळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार एका मर्यादेपर्यंत साऊंड सिस्टीमला परवानगी आहे. मात्र, साऊंड सिस्टीमने 70 डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच विसर्जन मिरवणुकीत मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंतच साऊंड सिस्टीमला परवानगी आहे. त्यानंतर पोलिस साऊंड सिस्टीमचा आवाज बंद करणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पापाची तिकटीकडे जाणारा चप्पल लाईनचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला आहे. मंगळवारी विसर्जन मिरवणुकीला या मार्गाचा वापर केला जाणार आहे. मिरजकर तिकटी, बिनखांबी, महाद्वार रोड या पारंपरिक मार्गाबरोबरच या चप्पल लाईनच्या मार्गावरूनही आता विसर्जन मिरवणूक असेल.
प्रमुख मिरवणूक मार्ग क्र. 1 : पार्वती टॉकिज सिग्नल, उमा टॉकिज चौक, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक ते टेंबे रोड, देवल क्लब, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड ते पापाची तिकटी ते गंगावेस ते (गंगावेसपासून नवीन मार्ग) पाडळकर मार्केट, रंकाळा स्टँड, रंकाळा टॉवर ते जॉकी बिल्डिंग, संध्यामठ, तांबट कमान, राज कपूर पुतळा, देवकर पाणंद पेट्रोल पंप, इराणी खण.
मार्ग क्र. 2 : पारंपरिक समांतर पर्यायी मार्ग - उमा टॉकिज चौक, आझाद चौक, दुर्गा चौक, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते पापाची तिकटी ते पुढे मार्ग क्र. 1 प्रमाणे.
मार्ग क्र. 3 : नवीन सुरू केलेला पर्यायी मार्ग - उमा टॉकिज चौक, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक, गोखले कॉलेज चौक, यल्लम्मा ओढा ते हॉकी स्टेडियम, निर्माण चौक, इंदिरासागर हॉल ते संभाजीनगर, देवकर पाणंद चौक ते क्रशर चौक इराणी खण.
वरील तिन्ही मार्गांवर मिरवणुकीत सामील होण्यासाठीचे मार्ग
मार्ग क्र. 4 : व्हिनस चौक, विल्सन पूल, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकिज, आझाद चौक, दुर्गा हॉटेल, बिंदू चौक, शिवाजी पुतळा ते पापाची तिकटी पुढे मार्ग 1 प्रमाणे.
मार्ग क्र. 5 : व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकिज पुढे मार्ग 1 व 2 प्रमाणे.
मार्ग क्र. 6 : फोर्ड कॉर्नर, आईसाहेब महाराज पुतळा, पद्मा चौक, बिंदू चौक, शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चप्पल लाईन, पापाची तिकटीवरून पुढे मार्ग क्र. 1 प्रमाणे.
मार्ग क्र. 7 : नंगिवली चौक, कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी ते पुढे मार्ग क्र. 1 प्रमाणे.
मार्ग क्र. 8 : खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर ते पुढे मार्ग क्र. 1 प्रमाणे.
मार्ग क्र. 9 : ताराबाई रोड रंकाळा ते साकोली कॉर्नर, तटाकडील तालीम ते महालक्ष्मी चौक पुढे मार्ग 1 प्रमाणे.