kolhapur | गांधीनगरवाल्यांना कोण, कुठे भेटून चर्चा करतोय, याचा माझ्याकडे व्हिडीओ

काँग्रेस नगरसेवकाच्या व्हिडीओ बॉम्बने सभागृह अवाक्
kolhapur | गांधीनगरवाल्यांना कोण, कुठे भेटून चर्चा करतोय, याचा माझ्याकडे व्हिडीओ
kolhapur | गांधीनगरवाल्यांना कोण, कुठे भेटून चर्चा करतोय, याचा माझ्याकडे व्हिडीओ
Published on
Updated on

कोल्हापूर : महापालिकेच्या महासभेत आरक्षणाच्या वेगवेगळ्या विषयांवरून सत्ताधारी महायुती आणि काँग्रेस नगरसेवकांत प्रचंड वादावादी झाली. श्रेयवादाचे आरोप करून एकमेकांना आरेतुरेची भाषा वापरण्यात आली. अखेर काँग्रेसचे नगरसेवक सुनील मोदी यांनी गांधीनगरवाल्यांना कोण कुठे भेटून चर्चा करतोय, याचा माझ्याकडे व्हिडीओ आहे, असे सांगताच सभागृह अवाक्‌ झाले.

दरम्यान, तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणधारकांना कोणत्याही पद्धतीने फायदा होऊ नये, अशी भूमिका शिवसेनेचे शारंगधर देशमुख यांनी घेतली. त्याअंतर्गत काँग्रेस नगरसेवकाने दाखल केलेला ठराव देशमुख यांनी नामंजूर करण्याचा इशारा देताच मागे घेतले. दरम्यान, ठरावावरून सभेत महायुती आणि काँग्रेस नगरसेवकांत ‘तू लै शहाणा आहेस, मला शिकवू नये’ असे म्हणून शाब्दिक वादावादी झाली.

श्रेयवादावरून नगरसेवकांत जुंपली...

शहरातील बी वॉर्ड सि. सि. नं. २८३२ खण भाग येथील रहिवाशी महाराष्ट्र शासनाच्या अतिक्रमण नियमितीकरण धोरणानुसार पात्र निवासी अतिक्रमणे नियमित करून सामान्य नागरिकांना मालकी हक्क देण्याबाबतचा ठराव प्रवीण सोनवणे यांनी मंजुरीसाठी दाखल केला होता. मात्र शासन जीआर आहे, आ. अमल महाडिक यांनी त्यासाठी पाठपुरावा करत असून काम अंतिम टप्प्यात असल्याचे देशमुख यांच्यासह महायुती नगरसेवकांनी सांगितले. काँग्रेस नगरसेवकांनी त्यावर आक्षेप घेत शासनाचा जीआर आहे, तर मग आ. महाडिक कशाला प्रयत्न करत आहेत, अशी विचारणा केली. त्यावरून नगरसेवकांत वादावादी झाली.

मात्र महायुती नगरसेवकांनी आ. महाडिक त्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे स्पष्ट करून काँग्रेसने खोटे श्रेय घेऊ नये, असे सुनावले. ठरावावरून महायुती आणि काँग्रेस नगरसेवकांत जुंपली. एकमेकांना आरेतुरेची भाषा करून बोलू लागले. सुमारे पंधरा मिनिटे गोंधळ सुरू होता. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर महापौर रूपाराणी निकम यांनी हस्तक्षेप करून सर्वांना शांत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news