Gadhinglaj Municipality | गडहिंग्लजमधील समस्या आता व्हॉट्सॲपवरून थेट नगरपालिकेकडे; 'या' मोबाईल क्रमांकावर फोटो, माहिती पाठवा

४८ तासांत समस्यांचे निराकरण करण्याचे नगराध्यक्ष महेश सलवादे यांचे आश्वासन
Gadhinglaj Municipality
Gadhinglaj Municipality Pudhari
Published on: 
Updated on: 

Civic Issues Gadhinglaj

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील नागरिकांना आता आपल्या नागरी समस्या थेट नगरपालिकेपर्यंत पोहोचविता येणार आहेत. यासाठी नगरपालिकेने स्वतंत्र व्हॉट्सॲप क्रमांक सुरू केला असून, ९४०४०५५८५४ या क्रमांकावर स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्त्यांवरील खड्डे यांसह पालिकेशी संबंधित विविध समस्यांची छायाचित्रे व माहिती पाठविता येणार आहे.

प्राप्त तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर ४८ तासांत कार्यवाही करणे बंधनकारक राहणार आहे. निर्धारित वेळेत कार्यवाही न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे यांनी दिला.

Gadhinglaj Municipality
Gadhinglaj | गडहिंग्लजमध्ये आंदोलक-आमदार समर्थक भिडले

शहरातील विविध नागरी समस्यांबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरातील समस्यांवर सोशल मीडियावर सातत्याने चर्चा होते; मात्र अनेकदा या तक्रारी प्रत्यक्षात पालिकेपर्यंत पोहोचत नसल्याने त्यावर कार्यवाही करणे शक्य होत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सलवादे यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदार हसन मुश्रीफ यांनी शहरातील विकासकामांसाठी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून शहरातील रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. तसेच शहराची पाणीपुरवठा योजना ७३ टक्के पूर्ण झाली असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या परवानगीअभावी उर्वरित कामाला विलंब होत आहे. मार्च २०२७ अखेर ही योजना पूर्ण करून गडहिंग्लजकरांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Gadhinglaj Municipality
Knife attack gadhinglaj : शेत जमिनीच्या वादातून गडहिंग्लजला भर रस्त्यात चाकू हल्ला

पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करताना काही किरकोळ त्रुटी राहिल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान शहरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता त्यावर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा नागरिकांचे सहकार्य घेऊन योजना पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही सलवादे यांनी सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, बांधकाम सभापती रामगोंडा पाटील, नगरसेवक बसवराज खणगावे, अमर मांगले, संतोष चिकोडे, अण्णासाहेब देवगोंडा, दीपक कुराडे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.