Knife attack gadhinglaj : शेत जमिनीच्या वादातून गडहिंग्लजला भर रस्त्यात चाकू हल्ला

उपस्थित लोकांनी रामपुरे यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
Kolhapur Crime
Kolhapur Crime
Published on
Updated on

गडहिंग्लज : हेब्बळ (ता. गडहिंग्लज) येथील नातेवाईकांमधील किरकोळ शेत जमिनीच्या वादातून संकेश्वर रोडवरील अर्बन बँकेच्या दारातच चाकू हल्ला झाला. गडहिंग्लज शहरात अर्बन बँकेकडे शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या विरुपाक्ष रामपुरे यांच्यावर त्यांच्या नातेवाईकांनी चाकू हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.

Kolhapur Crime
Kolhapur Crime News | सांगलीतून चारचाकीतून आले अन् कोल्हापुरात घरफोडी केली

याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी, सदर रामपुरे व हल्ला करणारा युवक हे नातेवाईक असून त्यांची असलेली शेत जमीनवरून किरकोळ वाद आहे. महिनाभरापूर्वी या वादात मध्यस्थी होऊन या ठिकाणी मोजणी आणण्याचे ठरले होते.

Kolhapur Crime
Kolhapur Crime : बंद घरामागील दरवाजातून चोरट्यांचा प्रवेश; ९ लाखांचा मुद्देमाल लंपास

मात्र आज (दि.२१) सकाळी दहाच्या सुमारास बँक उघडण्याच्या कालावधीत रामपुरे हे दुचाकीवरून बँकेच्या दारात येऊन गाडी लावत होते. दरम्यान सदर नातेवाईक हा 'मामा लवकर आला...' असे म्हणून जवळ गेला व अचानक खिशातून चाकू काढून पोटात घुसवण्याचा प्रयत्न केला. रामपुरे यांनी हा वार चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही त्यांच्या पोटात चाकू घुसला. यानंतर हा नातेवाईक या ठिकाणी चाकू टाकून पसार झाला. उपस्थित लोकांनी रामपुरे यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news