कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘गद्दार दिवस’ आंदोलन

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘गद्दार दिवस’ आंदोलन
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना शिंदे गटाच्या वर्ष पूर्तीनिमित्त कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी छत्रपती शिवाजी चौकात गद्दार दिवस आंदोलन करण्यात आले.

शिंदे गटाच्या महाराष्ट्राच्या गद्दारीला मंगळवारी (दि.20) एक वर्ष पूर्ण होत आहे. खोकेवीरांच्या धोक्याने बळकवलेल्या सत्तेच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. त्यानुसार राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीतर्फे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. कोल्हापुरात शहर राष्ट्रवादीतर्फे मंगळवारी छत्रपती शिवाजी चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी 'चले जाव, चले जाव गद्दार गुवाहाटी चले जाव', 'महाराष्ट्र त्रस्त खोके घेऊन गद्दार मस्त', 'पन्नास खोके माजलेत बोके' 'गद्दार हटाव महाराष्ट्र बचाव, 'खोके सरकारचा चालणार नाही थाट, गद्दारांना दाखवू कात्रजचा घाट', 'गद्दार सरकार हाय हाय गद्दारांना इथे जागा नाय,' आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.

आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, महेंद्र चव्हाण, नगरसेवक सुनील पाटील, सुनील देसाई, महादेव पाटील, जयकुमार शिंदे, नितीनभाऊ पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news